पुणे कार अपघातात (Pune Car Accident) एक धक्कादायक माहिती मिळत आहे. अग्रवाल कुटुंबीयांचं अंडरवर्ल्ड कनेक्शन समोर आलं आहे. विशाल अग्रवाल (Vishal Agarwal) वडील सुरेंद्र कुमार अग्रवाल (Surendra Kumar Agarwal) यांचे अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनशी (Chhota Rajan) संबंध असल्याची माहिती उघड झाली आहे. भावांसोबत असलेल्या संपत्तीच्या वादात वेदांत अग्रवालच्या आजोबांनी छोटा राजनची मदत घेतली होती. (Pune Car Accident)
(हेही वाचा –Ujani Dam: प्रवासी बोट बुडाली; बचावकार्य सुरू)
या प्रकरणी अजय भोसले नावाच्या व्यक्तीच्या हत्येच्या प्रयत्नामध्ये सुरेंद्र कुमार अग्रवाल यांच्याविरोधात बंड गार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याचं समोर आलं आहे. (Pune Car Accident) मात्र या प्रकरणात मोक्का लावणं अपेक्षित असनाताही पुणे पोलीसांनी केवळ आयपीसीची कलमं लावून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. आरोपत्रही दाखल करेपर्यंत विशाल अग्रवालचे वडील सुरेंद्र कुमार अग्रवाल यांना अटक झाली नव्हती. (Pune Car Accident)
(हेही वाचा –IPL 2024, KKR in Finals : सनरायझर्स हैद्राबादचा धुव्वा उडवत कोलकाता अंतिम फेरीत )
मुंबई सत्र न्यायालयात छोटा राजनशी संबंधित सर्व प्रकरणं सीबीआयकडे हस्तक्षेप करण्यात आली होती. त्यामध्ये या प्रकरणाचा समावेश आहे. या प्रकरणी सुरेंद्र अग्रवाल यांनी छोटा राजनचा हस्तक असलेल्या विजय तांबट याची बँकॉक येथे जाऊन भेट घेतली होती. भावासाोबत असलेल्या संपत्तीच्या वादात राजनने आपल्याला मदत करावी अशी मागणी त्यांनी केली होती. नंतर अजय भोसले या व्यक्तीच्या खुनाच्या प्रयत्नात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. नंतर छोटा राजनला भारतात आणल्यानंतर त्याच्याशी संबंधित सर्व प्रकरणं ही सीबीआयकडे ट्रान्सफर करण्यात आली. त्यामध्ये सुरेंद्र अग्रवालांचे हे प्रकरण असल्याचं आता उघड झालं आहे. (Pune Car Accident)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community