पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात (Swargate bus station) एका 26 वर्षीय तरुणीवर बसमधे अत्याचार (Pune Crime) केल्याची घटना घडली आहे. यामुळे स्वारगेट बसस्थानकातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यातील पीडित 26 वर्षीय तरुणीवर पहाटे स्वारगेट एसटी स्टँडमध्ये उभ्या असलेल्या बसमध्ये बलात्कार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. (Pune Crime)
गुन्ह्याची नोंद
यातील संशयित आरोपी दत्तात्रय रामदास गाडे (Dattatreya Ramdas Gade) असं आरोपीचं नाव असून तो अद्याप फरार आहे. त्याच्यावर शिक्रापूर आणि शिरुर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद आहे. घटनेची माहिती मिळातच पोलिसांची पथके आरोपीच्या मागावर असून त्याचा शोध घातला जात आहे. दरम्यान आज ( 26 फेब्रुवारी) पहाटे 5.30 वाजताच्या सुमारास पुण्यातील एसटी स्टँडवरील वर्दळीच्या परिसरात ही घटना घडल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. (Pune Crime)
नेमकं काय घडलं ?
मिळालेल्या माहितीनुसार, 26 वर्षीय तरुणी काल (25 फेब्रुवारी) पहाटे पुण्याहून फलटणला निघाली होती. त्या दरम्यान बस स्थानकात ही घटना घडली. (Pune Crime) गुन्हा घडल्यावर दत्तात्रय गाडे हा आरोपी फरार झाला असुन त्याचा शोध पोलिसांकडून घेतला जातोय. बसस्थानकात पीडित तरुणीला चुकीची माहिती देऊन डेपोत थांबलेल्या शिवशाही बसमध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आला असल्याचे पुढे आले आहे. स्वारगेट बसस्थानकात ही घटना पहाटे साडे पाचच्या सुमारास घडली आहे. (Pune Crime)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community