Pune Crime: रील्स बनवण्यासाठी अल्पवयीन मुलांचा अजीब कारनामा; लोकांचे केले मोठ्या प्रमाणात नुकसान

164
Pune Crime: रील्स बनवण्यासाठी अल्पवयीन मुलांचा अजीब कारनामा; लोकांचे केले मोठ्या प्रमाणात नुकसान
Pune Crime: रील्स बनवण्यासाठी अल्पवयीन मुलांचा अजीब कारनामा; लोकांचे केले मोठ्या प्रमाणात नुकसान

पुण्याबरोबरच पिंपरी चिंचवड हे देखील गुन्हेगारीचे हब (Pune Crime) बनताना पहायला मिळत आहे. पुण्यातील वाहने फोडीची घटना ताजी असताना पिंपरी चिंचवडच्या वाकड परिसरातून पाच ते सहा अल्पवयीन मुलांनी वाहने फोडल्याची घटना समोर आली आहे. याशिवाय वाहने फोडत असताना मोबाईलमध्ये रील्स बनवताना देखील ते पहायला मिळत आहे. या घटनेचा सीसीटीव्ही समोर आला आहे. (Pune Crime)

दोन अल्पवयीन मुलं ताब्यात

मिळालेल्या माहितीनुसार, वाकड परिसरातील थेरगाव भागात सोमवारच्या (24 जून) मध्यरात्री अल्पवयीन मुलांनी कोयत्याने पार्क केलेल्या चारचाकी वाहनांच्या काचा फोडून मोठं नुकसान केलं आहे. थेरगाव परिसरात घडली आहे. हा प्रकार वाहनांची तोडफोड करुन परिसरात दहशत पसरवण्याचे प्रकार शहरात वारंवार घडत असल्याचे पाहायला मिळत आहे. थेरगाव भागातील एकता कॉलनी परिरात ही घटना घडली आहे. वाकड पोलिसांना हा प्रकार समजल्यानंतर तात्काळ पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. तर त्यांचा तिसरा साथीदार फरार झाला आहे. पोलिसांनी त्या तिसऱ्या साथीदाराचा शोध सुरू केला आहे. (Pune Crime)

अल्पवयीन मुलांचे गुन्हेगारीकडे वळण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढले

मागील काही दिवसांपासून शहरात वाहन तोडफोडीच्या घटना घडत आहेत. मात्र, आता पुन्हा तोडफोडीनं डोकं वर काढल्याने सामान्य नागरिकांमध्ये भिती निर्माण झाली आहे. पुढील तपास वाकड पोलीस करीत आहेत. अल्पवयीन मुलांचे गुन्हेगारीकडे वळण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळत आहे. प्रत्येक जण आपले वर्चस्व दाखवण्यासाठी कोणत्याही थराला जात असल्याचे पाहायला मिळत आहे. (Pune Crime)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.