छत्रपती शिवाजी महाराज यांचे शौर्य आणि पराक्रम सातासमुद्र पार पोहचले आहे. त्यामुळे महाराजांच्या मावळ्यांनी लढवलेले किल्ले पाहण्यासाठी परदेशातून नागरिक येत आसतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचे प्रतिक असलेला आणि नारवीर तानाजी मालुसरेंच्या बलिदानाचे जीवंत स्मारक असलेल्या किल्ले सिंहगडावर एक दुर्दैवी प्रकार घडला. पुण्यातील टवाळखोरांनी कॅनडामधून आलेल्या पर्यटकाला सिंहगड किल्ल्यावर शिव्या द्यायला शिकवत होते. (Pune Crime)
हेही वाचा-Sambhal Jama Masjid : संभलच्या ‘त्या’ विवादित दर्ग्याची चौकशी सुरू ; काय आहे वक्फ चा दावा ?
पर्यटक सिंहगड किल्ला सर करत होता. त्यावेळी त्याला काही महाराष्ट्रतील तरुण भेटले. याप्रसंगी आपण कुठून आलो आहेत, कसे आलो आहोत? हा मूळ परिचय सोडून त्या तरुणांनी विदेशी पर्यटकाला अश्लील भाषेत शिविगाळ करणयास सांगितलं. त्यांच्या सांगण्यावरून पर्यटकाने शिविगाळ केली. मात्र शिवीगाळ करत असताना आपण काहीतरी चुकीचं बोलत असल्याचं पर्यटकाला वाटलं. कारण विदेशी पर्यटक बोलत असताना तरुणांमध्ये हास्याचा लोट पसरला होता. (Pune Crime)
हेही वाचा- Donald Trump यांनी टॅरिफच्या यादीतून ‘या’ वस्तू वगळल्या !
‘अतिथि देवो भव’ आपली ही महाराष्ट्रची संस्कृती सांगते, पण महाराष्ट्रातील तरुणांनी पर्यटकाला महाराजांचा अनुभव सांगण्याऐवजी शिवीगाळ करण्यास भाग पाडले. अशी खंत त्या पर्यटकाच्या मनात उद्भवली. त्यामुळे ‘येथे पुन्हा येणार नाही’ असा त्या पर्यटकाने त्याचा व्हिडिओमध्ये उल्लेख केलाय. (Pune Crime)
दरम्यान, या प्रकरणाची गंभीर दखल घेत पुणे पोलिसांनी या टवाळखोरांवर कारवाईचा बडगा उगारत गुन्हा दाखल केला आहे. सध्या पुणे ग्रामीण पोलिसांकडून या टवाळखोरांचा शोध पोलीस घेत आहेत. कॅनडामधून आलेल्या पर्यटकाला सिंहगड किल्ल्यावर या टवाळक्यांनी शिव्या द्यायला शिकवल्या होत्या. याप्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झाला होता. त्यानंतर आता पोलिसांनी या प्रकारणी गुन्हा नोंदवून पुढील प्रक्रिया सुरू केली आहे. (Pune Crime)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community