Pune Crime : पुणे पोलीस आयुक्त ॲक्शन मोडवर गुन्हेगारांची परेड दुसऱ्या दिवशीही सुरुच

Pune Crime : पुण्यातील गुन्हेगारांची पुणे आयुक्तालयात परेड काढण्यात आली. त्यानंतर ७ फेब्रुवारी रोजी गुन्हे शाखा सामाजिक सुरक्षा विभाग आणि अमली पदार्थ विरोधी पथकांकडून अवैध धंदे आणि अमली पदार्थ तस्कारांची परेड काढण्यात आली.

286
Pune Crime : पुणे पोलीस आयुक्त ॲक्शन मोडवर गुन्हेगारांची परेड दुसऱ्या दिवशीही सुरुच
Pune Crime : पुणे पोलीस आयुक्त ॲक्शन मोडवर गुन्हेगारांची परेड दुसऱ्या दिवशीही सुरुच

पुण्याचे नवनियुक्त आयुक्त अमितेश कुमार (Amitesh Kumar) यांनी गुन्हेगारांची पुणे आयुक्तालयात (Pune Police Commissionerate) परेड काढली. ६ फेब्रुवारी रोजी काही गुन्हेगारांची परेड झाली. ७ फेब्रुवारी रोजी गुन्हे शाखा सामाजिक सुरक्षा विभाग आणि अमली पदार्थ विरोधी पथकांकडून अवैध धंदे करणाऱ्यांची आणि अमली पदार्थ तस्करांची पोलीस आयुक्त कार्यालयात परेड काढण्यात आली. (Pune Crime)

सध्या पुण्यात मोठ्या प्रमाणात ड्रग्स तस्करीची (drug trafficking) प्रकरणे समोर आली आहेत. या पार्श्वभूमीवर नव्या आयुक्तांनी गुन्हेगारांनाही दम भरला आहे. पुण्यातील पाचशेहून अधिक गुन्हेगारांचा या परेडमध्ये समावेश करण्यात येणार आहे. 32 पोलीस ठाण्यांत रेकॉर्ड असलेल्या गुन्हेगारांना बोलावण्यात आले आहे.

(हेही वाचा – Sharad Pawar यांचा निवडणूक आयोगाला ई-मेल; पक्ष आणि चिन्हासाठी सुचवले तीन पर्याय)

60 गुन्हेगारांची परेड

७ फेब्रुवारी रोजी 60 गुन्हेगारांची परेड घेण्यात आली. अवैध धंदे करणे, मटका, जुगार, क्लब, लॉटरी, अवैध पत्त्यांचा क्लब चालविणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांना गुन्हे शाखा, सामाजिक सुरक्षा विभागाकडून बोलविण्यात आले होते. यात नाईक, आंदेकर, कुंभार यांच्यासह इतर अनेक अवैध व्यावसायिकांना अवैध धंदे आढळून आल्यास मोठ्या कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा देण्यात आला.

या गुन्हेगारांमध्ये ज्यांच्या नावावर सातत्याने वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद आहे, असे स्थानिक पातळीवरचे गुन्हेगार आहेत. या गुन्हेगारांकडून चांगल्या वर्तणुकीचा फॉर्म भरून घेतला जाणार आहे. यामध्ये शस्त्रे, अमली पदार्थ आणि स्थानिक पातळीवरील गुन्ह्यात आरोपी असलेल्यांचा समावेश आहे.

आयुक्त अमितेश कुमार (Amitesh Kumar) यांनी यापूर्वीच शहरातील अट्टल आणि गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांवर नजर ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या. (Pune Crime)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.