Pune Crime : पुण्यात दारू पिऊन गाडी चालवल्यास होणार मोठी कारवाई; पोलिसांचा मोठा निर्णय

175
Pune Crime : पुण्यात दारू पिऊन गाडी चालवल्यास होणार मोठी कारवाई; पोलिसांचा मोठा निर्णय
Pune Crime : पुण्यात दारू पिऊन गाडी चालवल्यास होणार मोठी कारवाई; पोलिसांचा मोठा निर्णय

पुण्यात ड्रिंक अँड ड्राईव्ह (drunk and drive) घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून (Pune Crime) कठोर पावलं उचलायला सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून पुण्यात अनेक भीषण अपघात घडले आहेत. यातील अनेक अपघात दारु पिऊन गाडी चालवल्यामुळे घडल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे पुणे पोलिसांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

(हेही वाचा –हाथरस दुर्घटनेतील मृतांच्या परिवारातील एका व्यक्तीला सरकारने नोकरी द्यावी: Ramdas Athawale)

पुण्यात गेल्या 6 महिन्यात 1648 जणांवर ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यापूर्वी दारू पिऊन वाहन चालवणे यांच्यावर फक्त खटले पाठवून त्यांच्यावर कारवाई केली जात होती. मात्र यापुढे जर आता कोणी चालक दारू पिऊन गाडी चालवताना आढळून आला तर पहिल्यांदा त्याचे ड्रायव्हिंग लायसन्स 3 महिने रद्द केले जाईल, त्याच व्यक्तीने जर पुन्हा गुन्हा केला तर 6 महिन्यापर्यंत त्याचा परवाना रद्द होणार मात्र तिसऱ्या वेळीस पुन्हा तीच व्यक्ती आढळून आली तेव्हा मात्र त्याचे ड्रायव्हिंग लायसन्स कायमस्वरूपी रद्द होणार, अशी माहिती पुणे पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांनी दिली आहे. (Pune Crime)

(हेही वाचा –Marathi Movie Producer : मराठी निर्मात्याची झाडावर चढून गळफास घेण्याची धमकी; काय घडले शिवाजी पार्कात?)

पुण्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून अपघाताच्या अनेक घटना घडल्या असून, यामधील बहुतांश घटना हिट अँड रन प्रकरणातील असल्यामुळे एकच खळबळ माजली आहे. स्त्यावरून चालयचीसुद्धा भीती वाटू लागली आहे, अशाच प्रतिक्रिया सध्या पुण्यातील नागरिकांनी देण्यास सुरुवात केली आहे. (Pune Crime)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.