Pune Crime News : पुण्यात चाललंय तरी काय? मद्यधुंद तरुणाचे भर रस्त्यात अश्लील चाळे

119

विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे (Pune) शहरासह आसपासच्या परीसरात मागील अनेक दिवसांपासून गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या घटना घडत आहेत. त्यामुळे महिला सुरक्षे (Women’s safety) संदर्भात प्रश्न आणखी गंभीर बनत चालला आहे. दरम्यान पुण्यात मद्यधुंद अवस्थेमध्ये रस्त्याच्या मधोमध चारचारी गाडी उभी करून दारूच्या नशेत तरूणांनी अश्लील चाळे केल्याची संतापजनक घटना घडली आहे. या मद्यधुंद अवस्थेत असलेल्या तरुणाचे त्याने केलेल्या विचित्र कृत्याचे व्हिडिओ व्हायरल (viral video) होत आहेत. तसेच त्याच्या सोबत असलेला त्याचा मित्रही मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.  (Pune Crime News)

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यामध्ये मद्यधुंद अवस्थेमध्ये तरुणांनी अश्लील चाळे केले, सिग्नलवरती (Signal) रस्त्याच्या मधोमध आपली बीएमडब्लू (BMW) गाडी उभी करून, बाहेर येत रस्त्यावर लघुशंका केली, त्यानंतर एकाने त्या तरूणाला जाब विचारल्यानंतर त्याने पुन्हा एकदा अश्लील चाळे केले आणि भरधाव वेगात आपली कार पळवली. ही संतापजनक घटना समोर आली आहे. या घटनेविरोधात सर्वपक्षीय नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर पुणे पोलिसांकडून तरुणांचा शोध सुरू आहे. हा तरूण मद्यधुंद असून त्याच अवस्थेत तो BMW कार चालवत असल्याचं स्पष्ट झालं.

(हेही वाचा – Budget Session 2025 : पायऱ्यांवरील आंदोलनाचा बिनडोक, प्रसिद्धीलोलुप तमाशा महाराष्ट्रात कधी बंद होणार?)

व्हिडिओत काय दिसतंय?
पुणे नगर रोडवरती शास्त्रीनगर चौकात एक BMW कार (BMW car) उभी करत मद्यधुंद अवस्थेतील तरुणाने लघुशंका केली. यानंतर एका व्यक्तीने त्याला रोखण्याचा प्रयत्न केला असता त्याच्यासमोर अश्लील कृत्य करताना दिसतात. त्याचबरोबर भरधाव वेगात गाडी चालवून तरुण मित्रासह फरार झाला. पुण्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. त्यात महिला दिनाच्या दिवशी भररस्त्यात असा श्रीमंत बापाच्या मुलाचे संतापजनक कृत्य समोर आले आहे.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.