धक्कादायक! पुण्यात महिलेसह तिच्या दोन मुलांची चुलत दिराने केली हत्या

124

पुण्यातील कोंढवा परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. दोन चिमुकल्यांसह त्यांच्या आईचा चुलत दिराने खून करून त्यांचे मृतदेह जाळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आरोपी हा संबंधित महिलेचा चुलत दीर असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

( हेही वाचा : ‘हार्वर्ड डाएट प्लॅन’ म्हणजे काय? आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करावा, काय खाऊ नये…जाणून घ्या )

आम्रपाली वाघमारे (वय ३०), मुलगी रोशनी (वय ६) आणि मुलगा आदित्य (वय४) अशी या खून करून जाळण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू आहे. पोलिसांनी या दिराला ताब्यात घेतले आहे.

संशयातून हत्या 

चुलत दिर व आम्रपाली यांच्यात प्रेम संबंध होते. वर्षभरापूर्वी ते पुण्यात आले होते. आम्रपाली यांचा विवाह झालेला होता. पण त्या चुलत दिरासोबत येथे पळून आलेल्या होत्या. कोंढवा येथील पिसोळी भागात ते दोघे दोन मुलांसह राहत होते. दोन मुलं, आम्रपाली आणि चुलत दिर असे राहत असताना चुलत दिराला तिचे दुसऱ्याशी संबंध आहेत असा संशय होता. त्यावरून ही घटना घडली आहे, असे पोलिसांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.