नेहमीच चर्चेत असलेल्या पुण्यात बुधवारी भयंकर घटना समोर आली आहे, पुण्यातील मंगळवार पेठेत असणाऱ्या पुणे महानगर पालिकेच्या कमला नेहरू (Kamala Nehru Hospital) रुग्णालयाची संशयास्पदरित्या पहाणी करीत असताना तीन संशयास्पद तरुणांना रुग्णालयाच्या सुरक्षा रक्षकानी ताब्यात घेऊन पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. या घटनेनंतर रुग्णालय प्रशासनाकडून सुरक्षेच्या कारणास्तव तात्काळ संपूर्ण रुग्णालय रिकामे करून रुग्णालयाची तपासणी करण्यात आली आहे ,या तपासणी दरम्यान काहीही संशयास्पद वस्तू आढळून आलेल्या नसल्याची माहिती रुग्णालय प्रशासना कडून देण्यात आली आहे. दरम्यान पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलेल्या संशयित तरुणाची कसून चौकशी सुरू असून ते मागील दोन दिवसांपासून रुग्णालयात कशासाठी फिरत होते याची माहिती काढण्यात येत आहे. (Pune Crime)
पुण्यातील मंगळवार पेठ या ठिकाणी असलेल्या पुणे मनपाचे कमला नेहरू रुग्णालय आहे. या रुग्णालयात बुधवारी सकाळी गोंधळ निर्माण झाला होता, मंगळवारी तीन संशयित तरुण रुग्णालयात संशयास्पदरित्या फिरताना आढळून आल्याने त्यांचे फोटो काढून व्हायरल करण्यात आले होते, बुधवारी हे तीन संशयित पुन्हा रुग्णालयात संशयास्पदरित्या आढळून आले, आणि एकच गोंधळ उडाला, तेथील सुरक्षा रक्षकांनी त्यांना ताब्यात घेऊन पोलिसांना कळवले, काही वेळातच पोलीस त्या ठिकाणी आले व त्यांनी संशयित तरुणांना ताब्यात घेतले. (Pune Crime)
रुग्णालयातील सुरक्षा रक्षकानी प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधीना माहिती देताना सांगितले की, मंगळवारी एक फोटो व्हायरल झाला होता, बुधवारी फोटोतील हे तिघे तरुण पुन्हा रुग्णालयात दिसून आले, त्यांना ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता हे तिघे मंगळवारी रक्त तपासणीसाठी आले होते अशी त्यांनी माहिती दिली, तसेच आज (बुधवारी)पुन्हा ते रक्त तपासणीसाठी आले व आम्ही त्यांना ताब्यात घेतले, त्यांची बॅग तपासली असता बॅगेत बिहार राज्यातील आधारकार्ड मिळून आले. या तिघे शरीराने धिप्पाड होते, व त्यांची वेशभूशा अफगाणी नागरिकां सारखी दिसत होती अशी माहिती येथील सुरक्षा रक्षकानी दिली आहे. (Pune Crime)
या तिघांना पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर हे तिघे नक्की कशासाठी रुग्णालयात आले, त्यांनी रुग्णालयात संशयास्पद वस्तू अथवा स्फोटके ठेवली तर नाही ना याची खात्री करण्यासाठी रुग्णालय प्रशासनाने तात्काळ रुग्ण आणि नातेवाईकांना बाहेर काढून सुरक्षेच्या दृष्टीने संपूर्ण रुग्णालय परिसर तपासण्यात आला मात्र काहीही संशयास्पद आढळून आलेले नाही अशी माहिती रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.दरम्यान ताब्यात घेण्यात आलेल्या संशयास्पद तरुणांकडे पोलीस कसून चौकशी करीत असून त्यांची माहिती काढण्यात येत आहे. हे तिघे बांगलादेशी नागरिक असावे असा संशय व्यक्त करण्यात येत असून अधिक तपास सुरू आहे. (Pune Crime)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community