Pune Drug Case: पोलिसांची मोठी कारवाई; 84 लाखांचे अमली पदार्थ जप्त 

314

ड्रग्ज मुक्त सिटीचा संकल्प पुणे पोलिसांचा असला तरी तस्कर मात्र छुप्या पद्धतीने शहरात ड्रग्जचा पुरवठा करत असल्याचे दिसत येत आहे. यामध्ये पुणे गुन्हे शाखेच्या (Pune Crime Branch) पोलिसांनी दोन वेगवेगळ्या कारवांयामध्ये तब्बल 84 लाखांचे अंमली पदार्थ जप्त (police seized drugs 84 lakhs) केले आहेत. (Pune Drug Case)

मिळालेल्या माहितीनुसार, पहिल्या कारवाईत कोरेगावपार्क परिसरातून प्रणव रामनानी (Pranav Ramnani) आणि गौरव दोडेजा (Gaurav Dodeja) या दोन 19 वर्षीय तरुणांकडून 67 लाख 8 हजार रुपयांचे 2.78 ग्रॅम कोकेन (Cocaine) आणि 136.64 ग्रॅम ओजीकुश गांजा (Marijuana) जप्त करण्यात आला. या कारवाईत दोन महागड्या कारही जप्त करण्यात आल्या. तर दुसऱ्या कारवाईत लोणी काळभोर परिसरातील लोणकर वस्ती येथून राजस्थानच्या जालोर येथील भरतकुमार राजपुरोहित आणि आशुसिंग या दोघांकडून 40 किलो 390 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. या प्रकरणी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(हेही वाचा- Netaji Subhas Chandra Bose यांच्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन)

या दोन वेगवेगळ्या घटनेत पथक 1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उल्हास कदम (Police Inspector Ulhas Kadam) व अमंलदारांसह कोरेगावपार्क पोलिस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिस करत होते. त्यावेळी पोलिस अमंलदार संदीप शिर्के यांना कोरेगावपार्क येथील क्लोअर गार्डन सोसायटी परिसरात प्रणव नवीन रामनानी (19, रा. बंडगार्डन) आणि गौरव मनोज दोडेजा (19, रा. कोरेगावपार्क) यांच्या ताब्यातून 67 लाख 8 हजारांचा 2 ग्रॅम 78 मिली ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले. तसेच 136 ग्रॅम 64 मिली ग्रॅम ओजीकुश गांजा जप्त करण्यात आला.यावेळी दोन महागड्या कारही जप्त करण्यात आल्या.

(हेही वाचा – Ministry समोर नाशिकच्या तरुणाचे आंदोलन; प्रशासनातील भ्रष्टाचाराविरोधात आक्रोश)

तर दुसर्‍या कारवाई अंमली पदार्थ विरोधी पथक 2 चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुदर्शन गायकवाड हे त्यांच्या अमंलदारांसह लोणी काळभोर परिसरात गस्त घालत होते. यावेळी पोलिस अमंलदार योगेश मांढरे यांना एक राजस्थानी व्यक्ती गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली. यावेळी पथकाने लोणकर वस्ती येथील ज्ञानाई बंगल्यासमोरील सार्वजनिक रस्त्यावरून भरतकुमार दानाजी राजपुरोहीत (35) आणि आशुसिंग गुमानसिंग (दोघेही रा. जालोर, राजस्थान) यांना ताब्यात घेऊन चौकशी केली. यावेळी त्यांच्याकडून तब्बल 40 किलो 390 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. त्यांच्यावर लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

हेही पाहा –


Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.