मागील काही दिवसांपासून मुंबई पुण्यासह इतर ठिकाणी अमली पदार्थांची तस्करी (Drug trafficking) मोठ्या प्रमणात वाढली आहे. अशीच पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये विद्यचे माहेर घर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात अमली पदार्थ विक्रीप्रकरणी तीन उच्चशिक्षित तरुणांना सिंहगड परिसरातून अटक करण्यात आली आहे. (Pune Drug Case)
सिंहगड रस्ता (Sinhagad Road, Pune) परिसरात ही अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या तरुणांना अटक केली आहे. महत्त्वाचे म्हणजे अमली पदार्थांची विक्री करणारे तरुण उच्चशिक्षित (Highly educated youth) होते. यामध्ये अंशुल संतोष मिश्रा (वय २७, रा. बुलडाणा), आर्श उदय व्यास (वय २५, रा. पंतनगर, घाटकोपर पूर्व, मुंबई), पियुष शरद इंगळे (वय २२, रा. चिखली, चिंचवड) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.
(हेही वाचा – Fact Check : अपूर्ण आकडेवारी जाहीर करून महाराष्ट्रात EVM घोटाळा झाल्याचा अपप्रचार)
या संशयित आरोपींपैकी अंशुल बी.ए पदवीधर आहे. आर्श एका विमान कंपनीत नोकरी करत आहे. तर पियुषने संगणक अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. हे तिघेजण अमली पदार्थ विकत (Selling drugs) असल्याचे समोर आले आहेत. ग्रुपमधील काही तरुणांना हे तिघेही अमली पदार्थांची विक्री करत होते. या तिन्ही आरोपींची झडती घेतल्यावर २५१ ग्रॅम गांजा, १५ ग्रॅम मेफेड्रोन आणि ६२ मिलिग्रॅम एल.एस. डी अमली पदार्थ आढळून आले. याप्रकरणी गुन्हे शाखा अधिक तपास करत आहेत.
हेही वाचा –
Join Our WhatsApp Community