Pune Drugs Case: पुण्यात चाललंय तरी काय? शिक्षणाच्या माहेरघरात १ कोटीचे अमली पदार्थ केले जप्त 

116
Pune Drugs Case: पुण्यात चाललंय तरी काय? शिक्षणाच्या माहेरघरात १ कोटीचे अमली पदार्थ केले जप्त 
Pune Drugs Case: पुण्यात चाललंय तरी काय? शिक्षणाच्या माहेरघरात १ कोटीचे अमली पदार्थ केले जप्त 

ललित पाटील (Lalit Patil) प्रकरणानंतर आणि पबमध्ये घडत असलेल्या घडामोडींमुळे ड्रग्ज तस्करीचे (drug trafficking) मोठे रॅकेट पुण्यात पसरले आहे, भविष्यात पुण्यात ड्रग्जचे शहर म्हणून ओळखले जाईल की काय अशी भीती आता पुणेकरांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांमध्ये पुण्यात मोठी ड्रग्ज रॅकेट्स समोर येत आहेत. अशातच पुण्यात पुन्हा एकदा ड्रग्ज रॅकेट उघड झालं आहे. विश्रांतवाडी परिसरात एमडी ड्रग्जचा साठा पुणे पोलिसांकडून जप्त करण्यात आला आहे. या ड्रग्जचे किंमत तब्बल एक कोटीपेक्षा जास्त असल्याची माहिती मिळाली आहे. साधारण अर्धा किलो एमडी ड्रग्जचासाठा पोलिसांकडून जप्त करण्यात आला आहे. (Pune Drugs Case)

(हेही वाचा – Raj Thackeray: आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज ठाकरेंनी पवार आणि ठाकरेंना घेरलं)

पुण्यातील विश्रांतवाडी (Pune Vishrantwadi) परिसरातून हे एक कोटीचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी तीन तरुणांना ताब्यात घेतलं आहे. लोहगाव येथील विघ्नहर्ता अपार्टमेंटमधून या तीन तरुणांना ताब्यात घेतलं आहे. त्यांच्या ताब्यातून तब्बल एक कोटी रुपयांचे ४७१ ग्रॅम मेफेड्रोन हस्तगत करण्यात आले आहे. 

पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने ही कारवाई केली आहे. श्रीनिवास संतोष गोदजे, रोहित शांताराम बेंडे आणि निमिश सुभाष अभनावे असं अटक करण्यात आलेल्या तरुणांची नावे आहेत. विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Drugs Case)

(हेही वाचा – अब्जावधींचा रॅण्ड घोटाळा करणाऱ्या गुप्ताची Uddhav Thackeray यांनी दिल्लीत घेतली भेट; नरेश म्हस्केंचा गौप्यस्फोट)

या प्रकरणाचा त्यांच्या पातळीवर तपास करत पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे. या संपूर्ण प्रकरणात आंतरराष्ट्रीय रॅकेट असण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान, पुणे पोलिसांनी एकाचवेळी एक कोटींहून अधिक किमतीचे ड्रग्ज जप्त केल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये अनेक ठिकाणी ड्रग्जचा वापर होत असल्याचं आता समोर येत आहे. काही महिन्यांपूर्वी ससून रुग्णालयजवळ तब्बल दोन कोटी रुपयांचे ड्रग्ज सापडले होते. तेव्हापासूनच ड्रग्जचे पुणे कनेक्शन (Drugs Connection Pune) उघडकीस आले होते. अद्यापही संपूर्ण प्रकरणाच्या मुळाशी पोहोचणे पोलिसांना शक्य झालेलं नाही. (Pune Drugs Case)

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.