Pune Drugs Case: पोलिसांची मोठी कारवाई; २५ लाखांचे अमली पदार्थ जप्त; तिघांना अटक 

1378
Drugs च्या धंद्याला पोलिसांचा हातभार; लातूरमध्ये अमली पदार्थांचा बेकायदेशीर कारखाना उद्ध्वस्त

पुणे शहरात मागील काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटना वाढत आहेत. तसेच ड्रग्ज मुक्त सिटीचा (Drug Free City) संकल्प पुणे पोलिसांचा असला तरी तस्कर मात्र छुप्या पद्धतीने शहरात ड्रग्जचा (Drugs) पुरवठा करत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे पुण्यात पुन्हा एकदा ड्रग्स आढळून आले आहेत. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने २५ लाख रूपयांचे ड्रग्स जप्त केले आहेत. हे अंमली पदार्थ उच्चभ्रू विमाननगर (VimanNagar Drug case) आणि मार्केटयार्ड (Market Yard Drug case) परिसरातून जप्त करण्यात आले आहेत. (Pune Drug Case)

पोलीस आयुक्त अमितेश कुमार (CP Amitesh Kumar) यांनी अमली पदार्थ मुक्त पुणे ही मोहीम हाती घेतली आहे. पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार शहरातील अमली पदार्थ तस्करांविरुद्ध कारवाई करण्यात येत आहे. अमली पदार्थ विरोधी पथकातील पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड आणि पथक विमाननगर परिसरात गस्त घालत होते. लोहगाव- वाघोली रस्त्यावर एक जण थांबला असून, तो मेफेड्रोन (Mephedrone) विक्री करण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा लावून कुमेल महंमद तांबोळी (वय २८, रा. धानोरी) याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेण्यात आली. त्याच्याकडून १९ लाख १७ हजार ३०० रुपयांचे ८३ ग्रॅम मेफेड्रोन जप्त करण्यात आले. त्याच्याविरुद्ध विमानतळ पोलीस ठाण्यात गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.

(हेही वाचा – भाजपाच्या सदस्यता मोहिमेचा आढावा; Ravindra Chavan यांचे मार्गदर्शन)

तसेच मार्केट यार्डात भागात गांजा विक्री (marijuana) प्रकरणात सैफन उर्फ शफिक इस्माइल शेख (वय ५२, रा. आनंदनगर) याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून सात हजार रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला. सैफन गांजा विक्री करण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलीस कर्मचारी अजीम शेख यांना मिळाली होती. पोलिसांच्या पथकाने सापळा लावून त्याला पकडले. विमाननगर भागात मेफेड्रोन विक्री प्रकरणात किरण भाऊसाहेब तुजारे (वय २४, रा. आव्हाळवाडी, वाघोली) याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून सहा लाख २७ हजार रुपयांचे ३० ग्रॅम मेफेड्रोन जप्त करण्यात आले. तुजारे मेफेड्रोन विक्री करत असल्याची माहिती पोलीस कर्मचारी संदीप शिर्के यांना मिळाली होती. त्यानंतर कारवाई करुन त्याला ताब्यात घेण्यात आले.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.