पुण्यातील एफसी रोडवरील (Pune FC Rode) हॉटेल, पबमध्ये तरुण-तरुणी एन्जॉयमेंटसाठी येथे येतात, ते ड्रग्ज व अंमली पदार्थांचे सेवन करत पार्टी करतात. पुण्यातील अशाच एका हॉटेलमधील पार्टीत ड्रग्स घेणाऱ्या तरुणांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यामध्ये, चक्क हॉटेलमधील वॉश रुमममध्ये टॉयलेटजवळ बसून ते ड्रग्ज घेत असल्याचे दिसून येतात. या युवकांकडील हे ड्रग्ज, मॅफेनड्रग्स (Mafendrugs) असल्याचं प्राथमिक माहितीमधून समोर आलं आहे. पुण्यातील एफसी रोडवर असलेल्या लिक्विड लीजर लाउंज बारमध्ये (Liquid Lager Lounge Bar) ड्रग्ज पार्टी (Pune Drugs Party) सुरु असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत दोन जणांना अटक केली आहे. पुणे पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून लीजर लाउंज बार सील केला. तसेच शिवाजीनगर पोलिस ठाण्यातील बीट मार्शल यांना निलंबित करण्यात आले आहे. (Pune Drugs Case)
सोशल मीडियावरून मिळाली माहिती
पोलीस उपायुक्त संदीप गील (Deputy Commissioner of Police Sandeep Gill) यांनी सांगितले की, एफसी रोडवरील लिक्विड लीजर लाउंज बार लिमिटपेक्षा जास्त वेळ चालला असल्याची माहिती सोशल मीडियावरून मिळाली. बार मालक संतोष कामठे आणि सचिन कामठे यांनी हा बार करार करून तीन लोकांना रेंटवर दिला होता. (Pune Drugs Case)
(हेही वाचा –आदित्य ठाकरे पुन्हा वरळीत उभे राहतात की घाबरून…, Shrikant Shinde यांचा खोचक टोला)
रात्रभर चालली पार्टी
एफसी रोडवरील लीजर लाउंज बार नावाचा बार रात्री १.३० नंतरही सुरु होता. बारचे मुख्य प्रवेशद्वार बंद करून दुसऱ्या गेटने पार्टी करणाऱ्यांना आत प्रवेश दिला गेला होता. एका इव्हेंट मॅनेजरने ४० ते ५० लोकांना पार्टी करण्याची परवानगी हॉटेल मालकांकडून घेतली होती. (Pune Drugs Case)
(हेही वाचा – NEET UGच्या पुनर्परीक्षेत १५६३ पैकी ७५० विद्यार्थी गैरहजर, CBIने पहिला FIR नोंदवला)
बीट मार्शल यांना निलंबित
यातील सर्व जणांना ताब्यात घेतले आहे. एल 3 बार सील करण्यात आला आहे. जो व्हिडिओ व्हायरल होतो आहे, तो पदार्थ कोणता आहे. हे अमली पदार्थ विरोधी पथक तपास करत आहेत. 188 कलम, महाराष्ट्र दारूबंदी कायदा या अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. शिवाजीनगर पोलिस ठाण्यातील बीट मार्शल यांना निलंबित केलं आहे. (Pune Drugs Case)
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community