पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावरील ड्रग्स पार्टी प्रकरणात पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. (Pune Drugs Case) शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे गुन्हे पोलीस निरिक्षक अनिल माने आणि सहायक पोलीस निरीक्षक दिनेश पाटील यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे. यापूर्वी दोन बीट मार्शलला देखील या प्रकरणात निलंबित करण्यात आले आहे, तर आतापर्यंत या प्रकरणात ९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून आठ जणांना अटक करण्यात आल्याचे पोलीस उपायुक्त संदीप गिल यांनी सांगितले.
(हेही वाचा – …तर पुढच्या पिढीनं जगायचं कसं? ओबीसी-मराठा आरक्षण वादावर Raj Thackeray यांचे परखड भाष्य )
पहाटे पाचपर्यंत पब सुरू असल्याचा आरोप
यामध्ये संतोष विठ्ठल कामठे, सचिन विठ्ठल कामठे, उत्कर्ष कालिदास देशमाने, योगेंद्र गिरासे, रवी माहेश्वरी, अक्षय दत्तात्रय कामठे, दिनेश मानकर आणि मोहन राजू गायकवाड या आठ जणांना अटक करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक सविता सपकाळे यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. एफसी रोडवरील एका पबच्या शौचालयात अंमली पदार्थांचे सेवन काही युवक करत असल्याचा दावा करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर रविवारी एकच खळबळ उडाली. या व्हिडिओमुळे पुन्हा एकदा राज्य उत्पादन शुल्क विभागासह पोलिस प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. तसेच या व्हिडिओमध्ये दिसणारा वेळ हा मध्यरात्री दीड नंतरचा असल्यामुळे पोलिस आणि उत्पादन शुल्क विभागाचे नियम धुडकावून पहाटे पाचपर्यंत पब सुरू असल्याचा आरोप देखील करण्यात येत आहे.
पोलीस उपायुक्त संदीप गिल म्हणाले की, पुणे ड्रग्ज प्रकरणात आतापर्यंत ९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर ८ जणांना अटक करण्यात आली आहे. व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या मुलांचा पुणे पोलीस शोध घेत आहेत. या प्रकरणाची योग्य चौकशी होणार आहे. पार्टी करणाऱ्या ग्रुपने जेवण आणि दारूवर ८० ते ८५ हजार खर्च केले आहेत. ४० ते ५० जणांची तपासणी होणार आहे. सीसीटीव्ही पाहून तपासणी केली जाणार आहे. अनेकदा सूचना देऊन देखील अंमलदार आणि अधिकाऱ्यांनी लक्ष ठेवण्यात दिरंगाई दाखवली म्हणून दोन अधिकारी आणि दोन अमलदारांवर कारवाई करण्यात आली आहे. (Pune Drugs Case)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community