PUNE: २ दिवसांत १५४ वाहनचालकांवर ‘ड्रंक अॅण्ड ड्राइव्ह’ची कारवाई

165
PUNE: २ दिवसांत १५४ वाहनचालकांवर 'ड्रंक अॅण्ड ड्राइव्ह'ची कारवाई

दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांविरोधात वाहतूक पोलिसांनी कारवाईची मोहीम हाती घेतली, असून शहरातील विविध भागांत नाकाबंदी करून १५४ मद्यपी चालकांवर कारवाई केली. गुरुवारी आणि शुक्रवारी (दि. ३० व ३१) या दोन दिवसांत ही कारवाई करण्यात आली आहे. (PUNE)

यादरम्यान एकूण २ हजार ५७३ वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यातील १५४ वाहनचालक मद्यपान करून वाहन चालवत असल्याचे उघडकीस आले. फरासखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये सर्वांत जास्त १४ कारवाया करण्यात आल्या. त्यानंतर मुंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत १० आणि खडक व कोरेगाव पार्क पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रत्येकी नऊ कारवाया केल्या आहेत. ड्रंक ॲण्ड ड्राइव्हसोबत इतर ६८५ कारवाया करून सहा लाख २४ हजार ६५० रुपयांचा दंड आकारण्यात आला. त्यातील एक लाख ४९ हजार ८०० रुपये दंड नाकाबंदी दरम्यानच वसूल करण्यात आला आहे. (PUNE)

(हेही वाचा – Nanded: खळबळजनक ! नांदेडमध्ये ३९१ मशीन गनचे राऊंड सापडले; कसा लागला शोध? )

कारवाईसाठी ब्रेथ ॲनालायझरचा वापर
वाहतूक शाखा व स्थानिक पोलीस स्टेशन यांच्याकडून संयुक्तपणे संपूर्ण पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत २२ पोलीस ठाणे अंतर्गत २४ ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती. या कारवाईसाठी प्रत्येक पोलीस ठाण्यातील १ पोलीस अधिकारी व ४ अंमलदार, वाहतूक शाखेकडील एक पोलीस अधिकारी व ३ अंमलदार याप्रमाणे एका नाकाबंदीच्या ठिकाणी २ पोलीस अधिकारी व ७ अंमलदार नेमण्यात आले होते. ड्रंक ॲण्ड ड्राइव्ह कारवाईसाठी ब्रेथ ॲनालायझरचा वापर करण्यात आला.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.