-
मुंबई – संतोष वाघ
मुंबईत घडलेल्या सुनील मोरे प्रकरणाची पुण्यात पुनरावृत्ती झाली आहे. छत्तीसगढ येथून प्रियकरासोबत पुण्यात पळून आलेल्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर रेल्वे प्रोटेक्शन फोर्सच्या हेड कॉन्स्टेबल आणि एका एनजीओच्या कर्मचाऱ्याने ५ दिवस डांबून ठेवत तिच्यावर बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली. या घटनेने पुणे शहर हादरले आहे. छत्तीसगढ पोलिसांनी याप्रकरणी हेड कॉन्स्टेबल आणि एनजीओ कर्मचाऱ्याविरुद्ध पॉक्सो, बलात्कार, डांबून ठेवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून हा गुन्हा पुणे लोहमार्ग पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. पुणे लोहमार्ग पोलिसांनी मंगळवारी एनजीओ कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली असून हेड कॉन्स्टेबल फरार असून त्याचा कसून शोध घेण्यात येत असल्याची माहिती पुणे लोहमार्ग उपविभागीय पोलीस अधिकारी महेश देवीकर यांनी ‘हिंदुस्थान पोस्ट’शी बोलताना दिली आहे. (Pune GRP)
अनिल पवार असे फरार झालेल्या हेड कॉन्स्टेबलचे नाव आहे. तसेच कमलेश तिवारी याला अटक करण्यात आली आहे. अनिल पवार हा रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (RPF) पुणे येथे कार्यरत होता. कमलेश तिवारी हा पुण्यातील एका स्वयंसेवी संस्थेत (NGO) नोकरीला होता. छत्तीसगढ येथून १७ वर्षांची एक अल्पवयीन मुलगी आपल्या प्रियकरासोबत ९ सप्टेंबर रोजी पळून १२ सप्टेंबर रोजी दोघे पुणे रेल्वे स्थानक या ठिकाणी आले होते. या दरम्यान रेल्वे प्रोटेक्शन फोर्सचे हेड कॉन्स्टेबल अनिल पवार यांना हे जोडपे रेल्वे स्थानकावर आढळून आल्यावर त्याने दोघांना मदत करण्याच्या हेतूने रेल्वे वसाहत येथे असणाऱ्या एका स्वयंसेवी संस्थेत घेऊन आला व त्या ठिकाणी अनिल पवार याने कमलेश सुताराच्या मदतीने या दोघांना त्या ठिकाणी ५ दिवस डांबून ठेवत १७ वर्षांच्या पीडितेवर बलात्कार केला. (Pune GRP)
त्यानंतर अनिल पवार याने पीडितेला तिच्या आई-वडीलांच्या ताब्यात देण्यासाठी पीडितेच्या प्रियकराकडून ६ हजार रुपये घेऊन त्यांना सोडण्यात आले. पीडित मुलगी आणि तिच्या प्रियकराचा छत्तीसगढ पोलिसांकडून शोध सुरु असताना या दोघांना छत्तीसगढ पोलिसांनी ताब्यात घेत पीडितेची सुटका करून प्रियकराला छत्तीसगढ पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याच्या चौकशीत पीडित मुलीवर उद्भवलेल्या प्रसंगाची माहिती छत्तीसगढ पोलिसांना कळली. छत्तीसगढ पोलिसांनी तात्काळ पीडित मुलीचा जबाब नोंदवून रेल्वे प्रोटेक्शन फोर्सचे हेड कॉन्स्टेबल अनिल पवार एनजीओ कर्मचारी कमलेश तिवारी यांच्या विरुद्ध भारतीय दंड विधान कलम ३४२ (बेकायदेशीर डांबून ठेवणे), ३५० (गुन्हेगारी कृत्य करण्यासाठी बेकायदेशीरित्या घुसखोरी करणे), ३८४ (खंडणी), ३७६ (बलात्कार), ३७६ (२) (एन) (सरकारी पदाचा गैरवापर करून महिलेवर वारंवार बलात्कार करणे), ५०६ (धमकी देणे), ३४ (सह) आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण कायदा, २०१२ कलम ४,६,८ (पोक्सो) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune GRP)
(हेही वाचा – KEM : केईएम रुग्णालयात औषध आणि वैद्यकीय साहित्याच्या साठ्याकरता स्वयंचलित व्यवस्थापन प्रणालीचा वापर)
छत्तीसगढ पोलिसांनी हा गुन्हा पुणे लोहमार्ग पोलिसांकडे वर्ग केला असून, ३० ऑक्टोबर रोजी पुणे लोहमार्ग पोलिसांनी तात्काळ या गुन्ह्याची दखल घेऊन या गुन्ह्याच्या तपासासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी महेश देवीकर यांच्याकडे देण्यात आला आहे. दरम्यान, पुणे उपविभागीत अधिकारी (लोहमार्ग) यांनी तात्काळ या गुन्ह्यातील आरोपी कमलेश तिवारी याला अटक केली. मात्र, गुन्हा दाखल झाल्याचे कळताच हेड कॉन्स्टेबल अनिल पवार हा फरार झाला असून त्याचा कसून शोध घेण्यात येत असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी महेश देवीकर यांनी ‘हिंदुस्थान पोस्ट’शी बोलताना दिली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल पवार याने ज्या स्वयंसेवी संस्थेच्या कार्यालयात पीडितेला डांबून ठेवले होते, ती स्वयंसेवी संस्था अनिल पवार याच्या मेव्हण्यांच्या नावाने नोंद आहे. पोलिसांनी या संस्थेच्या कार्यालयाला सील केले आहे. दरम्यान, अनिल पवार याला रेल्वे प्रोटेक्शन फोर्स मधून निलंबित करण्यात आले असून त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर देखील निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. फरार झालेल्या अनिल पवार याचा कसून शोध घेण्यात येत असून रेल्वे गुन्हे शाखेचे पथक देखील त्याच्या मागावर आहे. (Pune GRP)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community