पुण्यात हिट अँड रनच्या (Pune Hit and run) प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. काही दिवसांपूर्वी मुळशी तालुक्यात शाळकरी मुलांना उडवल्याची घटना घडली होती. त्यात १४ वर्षीय मुलगा प्रेम साहेबराव चव्हाण (Prem Sahebrao Chavan) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेने चव्हाण कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मुळशी तालुक्यात असणाऱ्या शेरे गावात मामासाहेब मोहोळ विद्यालयामध्ये प्रेम शिक्षण घेत होता. दोन दिवसांपूर्वी प्रेम आणि त्याचे चार मित्र घरी जात असताना एका चार चाकी चालकाने या सर्वांना धडक दिली. यामध्ये प्रेम गंभीरित्या जखमी झाला होता.
प्रेमची मृत्यूशी झुंज अपयशी
आई-वडिलांच्या पोटचा एकुलता एक गोळा गेल्याने संपूर्ण मुळशी तालुक्यातुन हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. कारचालक घटनास्थळावरून फरार झाला होता. त्यानंतर पोलिसांनी घटनेचं गांभीर्य पाहता तातडीने कारवाई करत कारचालकाला ताब्यात घेतले होते. तर प्रेमवर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, अखेर प्रेमची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आणि त्याचा मृत्यू झाला. (Pune Hit and run)
परिसरातील नागरिकांनी केली प्रेमच्या उपचारासाठी आर्थिक मदत
चव्हाण कुटुंबीयांची घरची परिस्थिती बेताची असल्याने प्रेमवर उपचारासाठी त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत होता. त्याचे वडील गाडी चालक आहेत. या चव्हाण कुटुंबीयांना मदत करण्यासाठी परिसरातील नागरिकांनी पुढाकार घेत लाखो रुपये गोळा केले. प्रेमच्या उपचारासाठी त्यांनी चव्हाण कुटुंबीयांना आर्थिक मदत केली. मात्र, प्रेमचा जीव वाचवण्यात यश आले नाही. प्रेमला एक लहान बहीण आहे. (Pune Hit and run)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community