PUNE: हडपसर परिसरात कोयता गँगचा धुमाकूळ, दुकानांची तोडफोड; वाचा नक्की काय घडले?

या घटनेनं नागरिकांमध्ये पुन्हा भीतीचं वातावरण पसरलं आहे.

237
PUNE: हडपसर परिसरात कोयता गँगचा धुमाकूळ, दुकानांची तोडफोड; वाचा नक्की काय घडले?

हातात कोयते घेऊन कोयता गँगच्या गुंडांनी फुरसुंगी भेकराईनगर येथील दुकानांची तोडफोड केली. यावेळी त्यांनी खंडणीसाठी व्यापाऱ्यांनादेखील धमकावलं तसेच रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांवर दगडफेकदेखील केली. या धक्कादायक घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. (PUNE)

या घटनेनं नागरिकांमध्ये पुन्हा भीतीचं वातावरण पसरलं आहे. जेव्हा कोयता गँगचे गुंड धिंगाणा घालत दुकानांची तोडफोड करत होते, तेव्हा आम्ही कायद्याला अजिबात घाबरत नाही, असं ओरडून सांगत होते. या प्रकारामुळे फुरसुंगीतील रहिवासीसुद्धा हैराण झाले आहेत. (PUNE)

(हेही वाचा – Mumbai Rain: मुंबईमध्ये कधी होणार पावसाचं आगमन? हवामान खात्याने तारिख सांगितली…)

व्यापाऱ्यांना खंडणीसाठी धमकावलं
मिळालेल्या माहितीनुसार, फुरसुंगीतील भेकराईनगर परिसरात शनिवारी, (१ जून) सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास कोयता गँगचे गुंड आले. त्यांनी परिसरात धिंगाणा घालत व्यापाऱ्यांना खंडणीसाठी धमकावलं. स्थानिकांच्या माहितीनुसार, गुंडांच्या या टोळक्यामध्ये अभय गायकवाड ऊर्फ भुऱ्या ऊर्फ छोटा रावण तसेच त्याचे साथीदार अरविंद ऊर्फ नक्या अजय माने, गौरव मंडल, विजय बसवराज कुरले, माणिक नागेश सगर ऊर्फ वाढीव बबल्या यांचा समावेश होते.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.