विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात (Pune Crime News) मागील काही दिवसांतून गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार आहे. मे महिन्यात झालेलं पोर्श ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरण (Porsche drink and drive case) असो किंवा त्यानंतर काही महिन्यांनी झालेलं वनराज आंदेकर खून प्रकरण (Vanraj Andekar murder case). शहरात गुन्ह्यांच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली. तसेच पुण्यात शुल्लक कारणावरून वादावादी, भांडण, खून, मारामाऱ्या अशा अनेक घटना घडत असून कायदा-सुव्यवस्थेचे प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्यामुळे पुणे हे विद्येचे माहेरघर आहे की गुन्ह्यांचे असा सवाल संतप्त नागरिक उपस्थित करत आहे. (Pune Murder Case)
पुणे विद्येचं माहेर आहे की गुन्ह्यांचं असा प्रश्न पडावा अशा काही घटना पुण्यात घडल्या असून गेल्या तीन दिवसांमध्ये शहरात चक्क ५ खून झाले आहेत. त्यामुळे प्रचंड खळबळ माजली असून नागरिकांमध्येही भीतीचं, दहशतीचं वातावरण आहे. पहिली घटना सिंहगड रोड (सिंहगड रोड, Pune) पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नरे परिसरात घडली. तेथे गाडीतील पेट्रोल चोरत असल्याच्या संशयावरून चार जणांनी १८ वर्षाच्या तरुणाला बेदम मारहाण केली. त्या मारहाणीमध्ये गंभीर जखमी झालेल्या या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
(हेही वाचा – Mumbai Police : आंबिवलीच्या इराणी वस्तीत मुंबई पोलिसांवर हल्ला, ५ जखमी)
तर दुसऱ्या घटनेमध्ये सिंहगड रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीतच मंगळवारी रात्री , पूर्व वैमनस्यातून तीन अल्पवयीन तरुणांनी एका तरुणाचा खून केला. त्यामुळेही खळबळ माजली. तिसरी घटना पुण्यातील वानवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली. तेथे काही अल्पवयीन तरुणांनी कोयत्याने वार करत एका अल्पवयीन तरुणाला संपवलं. तर खुनाची चौथी घटना वाघोली पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडली. तर त्यानतंर कोंढवा पोलीस स्टेशनच्या (Kondhwa Police Station) हद्दीत एका व्यक्तीचा डोक्यात सिमेंटचा ब्लॉक घालून खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या पाचही घटनांमुळे शहरात कायदा- सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून गुन्हेगारांना लवकरात लवकर अटक करून कठोर कारवाई करण्याची नागरिकांकाडून मागणी होत आहे.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community