Pune News : पुण्यावर रात्रीच्या वेळी ड्रोनची नजर, नेमकं काय आहे प्रकरण?

167
Pune News : पुण्यावर रात्रीच्या वेळी ड्रोनची नजर, नेमकं काय आहे प्रकरण?
Pune News : पुण्यावर रात्रीच्या वेळी ड्रोनची नजर, नेमकं काय आहे प्रकरण?

पुणे (Pune News) जिल्ह्यातील बारामती, दौंड, इंदापूर, पुरंदर, भोर, मुळशी, आंबेगाव, शिरूर या तालुक्यांमध्ये रात्रीच्या वेळी काही ड्रोन घिरट्या घालत असल्याच समोर आलं आहे. रात्री साडेदहा ते मध्यरात्री 2 वाजेपर्यंत काही भागात हे ड्रोन घिरट्या घालत होते. ड्रोन कोण उडवतं होत? कशासाठी उडवतं होत? त्या मागचा हेतू काय होता? असे प्रश्न सध्या उपस्थित झाले आहेत. जूनच्या शेवटच्या आठवड्यात मुळशी तालुक्यातील भरे आणि बारामती तालुक्यातील माळेगाव येथे अशाचं ड्रोनच्या घिरट्या सुरू असताना, त्यातील एक ड्रोन एका घरावर आणि शेतात कोसळल्याची घटना घडली होती. (Pune News)

चोरीच्या उद्देशाने चोर ड्रोनच्या साह्याने टेहाळणी तर करत नाहीत ना?

हा ड्रोन कुणाचा होता? कशासाठी हा ड्रोन उडवण्यात येत होता? ह्याचा मात्र तपास लागलेला नाही. त्यानंतर नागरिकांमध्ये भीतीच वातावरण होतं, चोरीच्या उद्देशाने चोर ड्रोनच्या साह्याने टेहाळणी तर करत नाहीत ना? असा संशय नागरिकांमध्ये होता. मात्र अद्याप चोरीची कुठलीही घटना समोर आलेली नाही. नागरिकांच्या ड्रोन बाबतच्या तक्रारी वाढल्यानंतर ज्या भागात अशाप्रकारे अज्ञात ड्रोन आढळून येतील, त्या भागातील नागरिकांनी पोलिसांशी संपर्क साधण्याचं आव्हान पुणे ग्रामीणच्या पोलिस अधीक्षकांनी केलं होतं. अगदी हे ड्रोन पाडण्यासाठी पोलिसांनी जॅमर लावण्याचीही तयारी सुरू केली होती. त्यानंतर पुणे जिल्ह्यातील ड्रोनच्या घिरट्या बंद झाल्या. मात्र आता ह्या घिरट्या महाराष्ट्रातील इतर भागातही सुरू असल्याच्या चर्चा आहेत. (Pune News)

कुठलीही अनुचित घटना तर घडणार नाही ना?

ड्रोन रात्रीच्या अंधारात उडवून नक्की कुठला डेटा याद्वारे कलेक्ट केला जातोय, याचा शोध पोलिसांना लागला नसल्यानं याबाबतचं गुढ अद्याप कायम आहे. राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी फिरणाऱ्या या ड्रोनद्वारे कलेक्ट केलेल्या डेटाद्वारे कुठलीही अनुचित घटना तर घडणार नाही ना? या द्वारे विविध भागांची रेकी तर केली जात नाही ना? अशा अनेक शंका नागरिकांच्या मनात आहेत. त्यामुळे हे ड्रोन कोण उडवतं होत? कशासाठी उडवतं होत? त्या मागचा हेतू काय होता? असे अनेक प्रश्न नागरिकांना भेडसावत आहेत. (Pune News)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.