दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचाराच्या घटना (Pune News) सातत्याने वाढताना दिसत आहेत. गणेशोत्सव व सणासुदीच्या काळात शहरात मोठ्या प्रमाणात गर्दी होते. बाप्पाची मिरवणूक, बाप्पाच्या दर्शनासाठी हजारो लोक हजेरी लावतात. गर्दीच्या ठिकाणीही छेडछाड होण्याच्या घटना होतात. या घटनांवर आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांनी एक युक्ती आखली आहे.
रोडरोमिओंची परेड
गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांनी एक उपाय शोधून काढला आहे. पुण्यातील चौकात महिला व तरुणींची छेड काढणाऱ्या रोड रोमियोंचे फोटो लावले जाणार आहेत. भर चौकात छेड काढणाऱ्यांचे फोटो लावण्यात येणार आहेत. तसंच, रोडरोमिओंची परेडदेखील घेतली जाणार आहे. तरुणींची छेड काढून त्रास देणाऱ्या रोडरोमिओंची छायाचित्रे रस्तोरस्ती, भरचौकात फ्लेक्सवर प्रसिद्ध करण्याचा निर्णय पुणे पोलिसांनी घेतला आहे. (Pune News)
मदत केंद्रे सुरू करणार
गणेशोत्सव (Ganeshotsav) काळात शहरातील मध्य भागात १८ पोलिस मदत केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. उत्सवाची सांगता होईपर्यंत मदत केंद्राचे कामकाज अहोरात्र सुरू राहणार आहे. या केंद्रात स्थानिक पोलिस, विशेष शाखा आणि वाहतूक शाखेतील कर्मचारी तैनात असणार आहेत. तसेच गर्दीत चोरी करणाऱ्या चोरट्यांची यादी तयार करण्यात येणार आहे. (Pune News)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community