Pune News: पुण्यातील चितळे बंधू दुकानावर चोरट्यांकडून दरोडा; व्हिडीओ व्हायरल

129
Pune News: पुण्यातील चितळे बंधू दुकानावर चोरट्यांकडून दरोडा; व्हिडीओ व्हायरल
Pune News: पुण्यातील चितळे बंधू दुकानावर चोरट्यांकडून दरोडा; व्हिडीओ व्हायरल

पुण्यातील (Pune News) चितळे बंधूंच्या (Chitale bandhu) दुकानावर दरोडा पडला आहे. औंध बाणेर रोडवरील दुकान फोडण्यात आले असून चोरट्यांकडून डल्ला मारण्यात आला आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. सदर घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Pune Crime)

(हेही वाचा-Jammu and Kashmir ला राज्याचा दर्जा देण्यास हिवाळी अधिवेशनात प्रस्ताव आणणार! नेमका काय बदल होणार?)

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, या घटनेची माहिती मिळताच पुणे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच पुढील तपासाला सुरूवात केली आहे. चोरट्यांनी मोठ्या प्रमाणात रक्कम चोरल्याची प्राथमिक समोर आली आहे. पुणे पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू आहे. (Pune News)

या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ देखील समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, अंधाराचा फायदा घेत चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला आहे. दुकानात आल्यावर त्यांनी थेट जाऊन गल्ला फोडला. यामध्ये असलेली सर्व रक्कम घेऊन चोरटे पसार झाले आहेत. या घटनेबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. (Pune News)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.