पुणे (Pune) शहरात पुन्हा एकदा अमली पदार्थाचा मोठा साठा पोलिसांनी जप्त केला आहे. पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातून तब्बल ६० किलो गांजा पोलिसांनी कारवाईत जप्त केला आहे. पुणे (Pune) पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने ही कारवाई केली आहे. या प्रकरणी पुणे पोलिसांनी गांजाची तस्करी करणाऱ्या एका परप्रांतीय व्यक्तीला अटक केली आहे. नदीम मोईज शेख असे पोलिसांनी अटक केलेल्या परप्रांतीय आरोपीचे नाव आहे.(Pune)
हेही वाचा-औरंगजेब उद्धव ठाकरेंचे नवीन आराध्य दैवत ; Sanjay Nirupam यांची जहरी टीका
पोलिसांनी या कारवाईत १२ लाख रुपये किंमतीचा ६० किलो गांजा एका चारचाकी वाहनातून जप्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गांजा तस्करी करणाऱ्या एका परप्रांतीय आरोपीला अटक केली आहे. हा आरोपी मूळचा कर्नाटकचा असून पुणे शहरात गेल्या अनेक दिवसापासून आरोपीकडून गांजाची विक्री केली जात होती, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती.(Pune)
हेही वाचा- संजय राऊतांवर कारवाई करा; खासदार Naresh Mhaske यांची मागणी
मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी परप्रांतीय आरोपीला तब्यात घेतले आहे. पोलिसांनी त्याच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Pune)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community