कल्याणीनगर पोर्शे कार (Kalyaninagar Porsche car) अपघात प्रकरणातील आरोपीला मुंबई हायकोर्टाकडून (Mumbai High court) दिलासा देण्यात आला आहे. जामीनानंतर पुणे पोलिसांनी पुन्हा ताब्यात घेणं बेकायदेशीर असून बालसुधारगृहाच्या कस्टडीतून तात्काळ मुक्त करण्याचे निर्देश मुंबई हायकोर्टाकडून देण्यात आले आहेत. मुलाची आत्या पूजा जैननं हेबियस कॉर्पसअंतर्गत दाखल केलेली याचिका हायकोर्टानं स्वीकारली आहे. मुलाला आत्याच्या ताब्यात देण्याचे निर्देश जारी करण्यात आले आहेत. न्यायमूर्ती भारती डांगरे आणि न्यायमूर्ती मंजूषा देशपांडे यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. (Pune Porsche Accident)
काय आहे नेमके प्रकरण?
19 मे रोजी पुण्यातील कल्याणी नगर चौकात भरधाव येणाऱ्या पोर्शे कारखाली चिरडून दोन जणांचा जागीच मृत्यू झाला होता. यावेळी अल्पवयीन मुलगा कार चालवत होता. यानंतर त्या अल्पवयीन मुलाची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली होती. यादरम्यान अल्पवयीन मुलाच्या आत्येनं पुतण्यासाठी हायकोर्टात हेबियस कॉर्पस याचिका दाखल केली होती.
(हेही पाहा – Roger Federer : ‘तुम्ही कुठलाही खेळ खेळत असाल, तरी कधी ना कधी पराभवाची चव चाखावीच लागते,’ रॉजर फेडरर)
जामीन मिळाल्यानंतरही पुणे पोलिसांनी चुकीच्या पद्धतीने मुलाला डांबून ठेवल्याचा आरोप या याचिकेतून करण्यात आला होता. मुलाची आत्या पूजा जैननं हेबियस कॉर्पसअंतर्गत (Under habeas corpus) दाखल केलेली याचिका हायकोर्टाने स्वीकारली. यानंतर आता अल्पवयीन आरोपीला बालसुधारगृहाच्या कस्टडीतून (Juvenile Custody) तात्काळ मुक्त करण्याचे निर्देश मुंबई हायकोर्टाकडून देण्यात आले आहेत. तसेच त्या मुलाला त्याच्या आत्याच्या ताब्यात देण्याचे निर्देष मुंबई हायकोर्टाकडून देण्यात आले आहेत. (Pune Porsche Accident)
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community