Pune Porsche Accident: ‘बाळा’ची आई घरातून बेपत्ता; पोलिस घरी पोहोचल्यावर मिळालं वेगळंच उत्तर!

362
Pune Porsche Accident: 'बाळा'ची आई घरातून बेपत्ता; पोलिस घरी पोहोचल्यावर मिळालं वेगळंच उत्तर!
Pune Porsche Accident: 'बाळा'ची आई घरातून बेपत्ता; पोलिस घरी पोहोचल्यावर मिळालं वेगळंच उत्तर!

पुणे अपघात प्रकरणी (Pune Porsche Accident) कारवाईला वेग आला असुन आत्तापर्यंत पोलिसांनी 10 पेक्षा जास्त जणांना याप्रकरणात अटक केली आहे. ससून रुग्णालयातील डॉक्टरांवरही कारवाई होत आहे. त्यातच, डॉ. अजय तावरेंचं निलंबन करण्यात आलं असून ससूनचे डीन विनायक काळे यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे. आता, याप्रकरणी पोलिसांकडून मुलाच्या आईचीही चौकशी होणार असल्याची माहिती आहे. त्यासाठी, पोलिसांकडून शिवानी अग्रवाल (Shivani Agarwal) यांची विचारपूस केली असता, त्या घरात नसून बेपत्ता असल्याचं सांगण्यात आलं आहे. (Pune Porsche Accident)

शिवानी अग्रवाल यांची देखील चौकशी होणार

सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओनंतर तो व्हिडिओ माझ्या मुलाचा नाही, हे सांगताना ढसाढसा रडणाऱ्या शिवानी अग्रवाल कुठे गेल्या? असा प्रश्न पोलिसांनाही पडला आहे. पोलिसांकडून एकीकडे कारवाईला जोर आला असताना दुसरीकडे अग्रवाल कुटुंब पळ काढण्याचा प्रयत्न करत आहे. अपघातातील (Pune Porsche Accident) अल्पवयीन मुलासह आरोपी विशाल अग्रवाल (Vishal Agarwal) आणि सुरेंद्र अग्रवाल (Surendra Agarwal) यांना अटक करण्यात आली आहे. त्यानंतर, आता पोलिसांकडून मुलाची आई शिवानी अग्रवाल यांची देखील चौकशी होणार असल्याचे समजते आहे. (Pune Porsche Accident)

पोलिसांचे पथक त्यांना ताब्यात घेईल, या भीतीने बेपत्ता…

शिवानी अग्रवाल बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. ड्रायव्हरला धमकवल्याप्रकरणी क्राइम ब्रांच टीमकडून शिवानी अग्रवाल यांचा देखील तपास करायचा आहे. त्यामुळे, पोलिसांचे पथक त्यांना ताब्यात घेईल, या भीतीने त्या सध्या बेपत्ता आहेत. तर, शिवानी अग्रवाल यांचा फोन देखील बंद आहे. त्यामुळे, मुलाची आई व विशाल अग्रवाल यांच्या पत्नी नेमकं कुठं गायब झाल्या? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. (Pune Porsche Accident)

पोर्शे कार अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलाच्या आईने त्यांचा ड्रायव्हर गंगाराम यास धमकवलं होतं का? याचा तपास पोलिसांकडून सध्या सुरू आहे. त्याच अनुषंगाने पोलिसांकडून त्यांच्या नातेवाईकांना आणि भावांना निरोप देण्यात आला आहे. शिवानी अग्रवाल जिथे कुठे असतील त्यांना पोलिसांशी संपर्क साधायला सांगा, असे पोलिसांनी म्हटले आहे. (Pune Porsche Accident)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.