Pune Porsche Car Accident : पुण्याच्या पोर्स अपघातानंतर मुंबई पोलिसांकडून बार, पबबाहेर पडणाऱ्यांची तपासणी

216
Pune Porsche Car Accident : पुण्याच्या पोर्स अपघातानंतर मुंबई पोलिसांकडून बार, पबबाहेर पडणाऱ्यांची तपासणी
Pune Porsche Car Accident : पुण्याच्या पोर्स अपघातानंतर मुंबई पोलिसांकडून बार, पबबाहेर पडणाऱ्यांची तपासणी

पुण्यातील कल्याणी नगरच्या घटनेनंतर (Pune Porsche Car Accident) मुंबई पोलीस आणि वाहतूक पोलिसांनी मुंबईत विशेष मोहीम हाती घेतली आहे. मुंबईतील पब आणि बारच्या बाहेर मुंबई वाहतूक पोलिसांनी नाकाबंदी लावून मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्यावर कारवाई सुरू केली आहे तसेच बार, पबमध्ये अल्पवयीन मुलांना मद्य, अमली पदार्थ पुरवले जात आहेत, का याच्यावर साध्या वेशातील पोलिसांकडून लक्ष ठेवले जात जात आहे. मुंबईतील हुक्का पार्लरमध्ये पोलिसांनी अचानक तपासणी केली. (Pune Porsche Car Accident)

(हेही वाचा- India’s Head Coach : ‘भारतीय संघाचा प्रशिक्षक व्हायला आवडेल,’ – गौतम गंभीर )

मागील आठवड्यात पोलिसांनी ५० हून अधिक बार आणि पबवर छापे टाकले. त्यात ५ बारमध्ये बेकायदेशीर कृत्य होत असल्याचे आढळून आले. अल्पवयीन मुलांना मद्य दिल्याप्रकरणी पवई येथील एका बारवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच दादर येथील एका हॉटेलला दंड ठोठावण्यात आला असून हॉटेल कम बारच्या वेटर आणि व्यवस्थापकावर अल्पवयीन व्यक्तीला मद्य दिल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. (Pune Porsche Car Accident)

रस्त्यावरील अपघात टाळण्यासाठी ?

२,५०२ मद्यधुंद चालकांना मोटार वाहन कायद्याच्या कलमानुसार दंड ठोठावण्यात आला आहे. ही आकडेवारी जानेवारी ते मे ३१ दरम्यान केलेल्या कारवाईची असल्याचे पोलिसांनी सांगितले. विशेष ऑपरेशन्स, नाकाबंदी आणि सिग्नल, संवेदनशील भाग इत्यादींवर अचानक तपासणी केल्यामुळे ड्रक अँड ड्राईव्हची संख्या वाढल्याचे आढळून आले. एका अधिकाऱ्यांनी सांगितले की, आम्ही अशा प्रकारे केलेले ऑपरेशन्स विशेषत: ड्रक अँड ड्राईव्ह, अल्पवयीन मुलांच्या वाहन चालविण्यासंबंधित रस्त्यावरील अपघात टाळण्यासाठी आणि वाहतूक शिस्त राखण्यासाठी, करण्याचे उद्दिष्ट आहे, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. अल्पवयीन वाहन चालवताना म्हणजे, १६ वर्षांखालील वैध परवान्याशिवाय वाहन चालवताना, यावर्षी ७४ अल्पवयीन पकडले गेले आहेत, तर २०२३ मध्ये ही आकडेवारी ३७१ होती. (Pune Porsche Car Accident)

(हेही वाचा- Salman Khan प्रकरणात दुसऱ्या मॉड्युलमधील ५वा आरोपी गोगलीयाला हरियाणातून अटक)

अल्पवयीन वाहनचालकांवर कारवाई

मोटार वाहन कायद्यानुसार, अल्पवयीन वाहनचालकासाठी दंडाची रक्कम ५०० रुपये आहे, तर रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानुसार, २५ हजारचा दंड आहे तसेच अल्पवयीन मुलांच्या पालकांवर कायदेशीर कारवाई आणि वाहनाची नोंदणी रद्द करणे ही कारवाई केली जाते असे एका अधिकाऱ्यांनी सांगितले. मद्यपान करून वाहन चालवण्याच्या नियमित कारवाया व्यतिरिक्त, मुंबई वाहतूक पोलिसांनी पुणे प्रकरणानंतर मुंबईत केलेल्या अचानक तपासणीदरम्यान त्यांनी ४४२ मद्यधुंद वाहन चालक आणि २३ अल्पवयीन – वैध परवाना नसताना आणि दारूच्या प्रभावाखाली वाहन चालवताना पकडले गेले सर्वांवर त्वरित कारवाई करण्यात आली, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. (Pune Porsche Car Accident)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.