Pune Porsche Car Accident: पुण्यात बुलडोझर पॅटर्न! अवैध पबवर पालिकेची धडक कारवाई

200
Pune Porsche Car Accident: पुण्यात बुलडोझर पॅटर्न! अवैध पबवर पालिकेची धडक कारवाई
Pune Porsche Car Accident: पुण्यात बुलडोझर पॅटर्न! अवैध पबवर पालिकेची धडक कारवाई

पुण्यात पोर्श कारच्या धडकेत (Pune Porsche Car Accident) दोघांचा मृत्यू झाल्यानंतर प्रशासनाने आता मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणानंतर पुण्यातील अवैध पब संदर्भातील विषय ऐरणीवर आला आहे. पुण्यातील बेकायदा पबवर पुणे महापालिकेने बुलडोझर चालवला आहे. पुण्यातील कोरेगाव पार्कमध्ये बेकायदेशीरपणे बांधलेले पब पाडले जात आहेत. वॉटर्स आणि ओरेला असे दोन पब पाडण्याचे काम सुरू आहे. वेदांत अग्रवाल ज्या पबमध्ये होता, त्याच परिसरातील हे दोन पब असून त्यावर पुणे महापालिकेने कारवाई केली आहे. (Pune Porsche Car Accident)

(हेही वाचा –IPL 2024, Eliminator : दहशतवाद्यांच्या अटकेमुळे एलिमिनेटर सामन्यासाठी अहमदाबादमधील सुरक्षा व्यवस्था वाढवली )

पुण्यातील अपघातानंतर पुण्यात बुलडोझर चालवण्याच्या कारवाईला आता सुरूवात झाली आहे. कोरेगाव पार्क येथे अवैधरीत्या निर्माण करण्यात आलेल्या पब वर ही तोडकामाला सुरूवात झाली आहे. या प्रकरणानंतर या अवैध पबवर आतापर्यंत कारवाई का करण्यात आली नाही? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. (Pune Porsche Car Accident)

(हेही वाचा –“मातोश्रीचे लाचार श्री होणाऱ्यांना…” Shishir Shinde गजानन कीर्तिकरांवर का कडाडले?)

जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवस यांनी अल्पवयीन मुलांना दारू पुरवण्यासाठी पुणे शहरातील हॉटेल ट्रिलियन सिक्युरिटी प्रायव्हेट लिमिटेड आणि पंचशील इन्फ्रास्ट्रक्चर मॅरियट स्वीट-ब्लॅक तात्काळ बंद करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या आदेशावरून राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही कारवाई केली. (Pune Porsche Car Accident)

हेही पहा –

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.