निबंध भोवणार! Pune Porsche Car Accident प्रकरणी बाल न्याय मंडळाच्या सदस्यांची चौकशी होणार

234
निबंध भोवणार! Pune Porsche Car Accident प्रकरणी बाल न्याय मंडळाच्या सदस्यांची चौकशी होणार
निबंध भोवणार! Pune Porsche Car Accident प्रकरणी बाल न्याय मंडळाच्या सदस्यांची चौकशी होणार

कल्याणीनगर अपघात प्रकरणात (Pune Porsche Car Accident) अल्पवयीन कारचालकाला तीनशे शब्दांचा निबंध लिहिण्यासह विविध अटींवर अवघ्या पंधरा तासांत जामीन देणाऱ्या बाल न्याय मंडळाच्या सरकारनियुक्त सदस्यांची चौकशी केली जाणार आहे. त्यासाठी महिला व बालविकास विभागाने समिती स्थापन केली आहे. या सदस्यांकडून अल्पवयीन मुलाला जामीन देताना कायदेशीर बाबींचे पालन झाले आहे का? याची खातरजमा समिती करणार आहे. (Pune Porsche Car Accident)

(हेही वाचा –Pune Porsche Car Accident घटना पुन्हा घडवणार; डिजिटल पुराव्यांसाठी ‘एआय’चा वापर)

बालकल्याण विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे (Dr. Prashant Naranware) यांनी ‘मटा’ला दिलेल्या माहितीप्रमाणे, ‘समितीचे प्रमुख उपायुक्त दर्जाचे अधिकारी आहेत. बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) कायद्यातील तरतुदींनुसार ही समिती स्थापन करण्यात आली आहे. ती पुढील आठवड्यापर्यंत चौकशीचा अहवाल सादर करील. त्यानुसार पुढील कार्यवाही केली जाणार आहे.’ (Pune Porsche Car Accident)

नेमकं काय घडलं ?

कल्याणीनगरमध्ये ‘पोर्श’ कार भरधाव चालवून तरुण-तरुणीच्या अपघाती (Pune Porsche Car Accident) मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अल्पवयीन कारचालक मुलाला १९ मे रोजी बाल न्याय मंडळासमोर हजर केले असता मंडळाने या मुलाला ७५०० रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला होता. या मुलाने ‘आरटीओ’ कार्यालयात जाऊन वाहतूक नियमांचा अभ्यास करावा, रस्ते अपघात आणि त्यावर उपाययोजना या विषयावर तीनशे शब्दांचा निबंध लिहावा, पंधरा दिवस वाहतूक नियमनाचे काम करावे, अशा अटींवर मुलाला जामीन मिळाल्याने देशभरातून संताप प्रतिक्रिया उमटल्या. या आदेशाचा पुनर्विचार करण्यासाठी पोलिसांनी बाल न्याय मंडळाकडे अर्ज केला. त्यानंतर बाल न्याय मंडळाने आपल्या आदेशात दुरुस्ती करून सुरक्षेच्या कारणास्तव या मुलाला 5 जूनपर्यंत बालनिरीक्षण गृहात ठेवण्याचा आदेश दिला. (Pune Porsche Car Accident)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.