Pune Porsche Car Accident: अग्रवाल आणि पवार कुटुंब निकटवर्तीय? नितेश राणेंचा दावा

221
Pune Porsche Car Accident: अग्रवाल आणि पवार कुटुंब निकटवर्तीय? नितेश राणेंचा दावा
Pune Porsche Car Accident: अग्रवाल आणि पवार कुटुंब निकटवर्तीय? नितेश राणेंचा दावा

पुण्यातील कल्याणीनगर परिसरातील अपघातानंतर (Pune Porsche Car Accident) दररोज नवनवीन माहिती समोर येत आहे. या घटनेच्या कारवाईत दिरंगाई आणि कुचराई झाल्याचा आरोप केला जात आहे. तर कलम 304 लावण्यावरुन धंगेकरांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर (Devendra Fadnavis) दिशाभूल केल्याचा आरोप केला. या सर्व पाश्वभूमीवर आता आमदार नितेश राणे (nitesh rane) यांनी शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यावर निशाणा साधला आहे. एबीपी माझाशी बोलताना राणेंनी खुलासा केला आहे. (Pune Porsche Car Accident)

सु्प्रिया सुळे गप्प का आहेत?

नितेश राणे म्हणाले, “नेहमी बोलणाऱ्या सुप्रिया सुळे गप्प का आहेत? शरद पवार गटाकडून कोणती प्रतिक्रिया का व्यक्त होत नाही? प्रत्येक गोष्टीवर देवेंद्र फडणवीसांचा राजीनामा मागणाऱ्या सु्प्रिया सुळे गप्प का आहेत? अग्ररवाल आणि त्यांच्या कुटुंबाचे काही संबंध आहेत का? आरोपीचे वकील हे शरद पवार यांचे निकटवर्तीय असल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. देवेंद्र फडणीसांनी आयुक्तालयात बसून अतिशय स्पष्ट भूमिका मांडली आहे. त्या मुलावर कडक कारवाई सुरू आहे. आता सुप्रियाताईंनी त्या गप्प का आहेत ते आम्हाला सांगावे. त्यानंतर खूप रहस्य बाहेर येतील.” असं नितेश राणे म्हणाले. (Pune Porsche Car Accident)

(हेही वाचा –Pune Porsche Car Accident: अडीच कोटीच्या कारसाठी १७०० रुपये भरणे विशाल अग्रवालांना डोईजड! आरटीओने उचललं मोठं पाऊल)

महाराष्ट्रात जाणीवपूर्वक मतदान कमी व्हावं म्हणून प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केला, या विषयी बोलताना नितेश राणे म्हणाले, “निवडणूक आयोग आपल्या भारतात लोकशाही टिकवण्याचे काम करत आहे. हे हिरवे वळवळणारे साप आता आले आहेत. हरणार हे माहीत आहे. म्हणून बळीचा बकरा निवडणूक आयोगाला केले जात आहे. पराभव समोर दिसू लागल्याने शेमड्यासारखे उद्धव ठाकरे रडत आहेत. निवडणूक लढविण्याची लायकी नसल्याने नाक रडगाण्याचे काम सुरु आहे.” अशी टीका नितेश राणेंनी केली आहे. (Pune Porsche Car Accident)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.