दोन निष्पाप जीवांचा बळी घेणाऱ्या पुण्यातील कल्याणीनगर येथील अपघाताची (Pune Porsche Car Accident) घटना ‘एआय’(AI) द्वारे जिवंत करण्यात येणार आहे. या अपघातातील दोषींनी कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी पोलिसांनी हा निर्णय घेतला असून तांत्रिक पुरावे गोळा करण्यावर भर देण्यात येत आहे. ‘आर्टिफिशल इंटेलिजन्स’ द्वारे अपघाताची ती दुर्दैवी घटना जिवंत करण्यात येणार असून डिजिटल पुराव्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. यासाठी ‘एआय’ मधील तज्ज्ञांसह वाहन आणि रस्ते वाहतुकीशी संबंधित केंद्रीय संस्थांची मदत घेतली जाणार आहे. आता यातून नेमकं काय निष्पन्न होतं? काय नवी माहिती मिळते? हे पाहणं महत्वाचं ठरेल. (Pune Porsche Car Accident)
क्राईम सीन क्रिएट
पोलिसांनी अग्रवाल कुटुंबातील ड्रायव्हरला अटक केली आहे. या ड्रायव्हरचा कबुली जबाब नोंदवून घेतला आहे. अग्रवाल पिता-पुत्रांनी ड्रायव्हरला दोन दिवस घरात कोंडून ठेवल्याचा आरोप आहे. त्यामुळे गुन्हे शाखेने ड्रायव्हरला अग्रवाल यांच्या घरी नेऊन क्राईम सीन क्रिएट केला होता. गुन्हे शाखेने घरात उपस्थित असलेले कर्मचारी आणि रजिस्टरही तपासले. घरातील कर्मचाऱ्यांना काही प्रश्नही विचारले. (Pune Porsche Car Accident)
कोणते प्रश्न विचारले?
गेल्या शनिवारी पोर्शे कार घेऊन वेदांत, ड्रायव्हर किती वाजता बाहेर पडले? त्यावेळी घरात कोण कोण होते? तुम्हाला पोर्शे कार घ्यायला कोणी पाठवले? अग्रवाल यांच्या बंगल्यात येणाऱ्या सर्व वाहनांची नोंद रजिस्टरमध्ये होते का? असे काही प्रश्न विचारण्यात आले. (Pune Porsche Car Accident)
ड्रायव्हर गंगाराम पुजारी यांच्या पत्नीचीही चौकशी
घरातील नोकरांना हे प्रश्न विचारल्यानंतर पोलिसांनी अग्रवाल कुटुंबाच्या ऊर्वरीत वाहनांची माहितीही मागवली आहे. आता या प्रकरणात ड्रायव्हर गंगाराम पुजारी यांच्या पत्नीचीही चौकशी केली जाणार आहे. पार्वती पुजारी असं गंगाराम पुजारी यांच्या पत्नीचं नाव आहे. गंगारामला खरोखरच डांबून ठेवलं होतं का? कोणी डांबून ठेवलं होतं? गंगाराम घरातून कधी बाहेर पडला. किती दिवसानंतर आला? त्याला काही अमिष दाखवलं गेलं होतं का? आदी प्रश्न पोलिसांकडून पार्वती यांना विचारले जाऊ शकतात असं सांगितलं जात आहे. (Pune Porsche Car Accident)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community