पुण्यामध्ये दारूच्या नशेत गाडी चालवून (Pune Porsche Car Accident) दोघांना चिरडणाऱ्या अल्पवयीन मुलाचा आजोबा सुरेंद्र अगरवालचा (Surendra Agarwal) महाबळेश्वरमधील पंचतारांकित हॉटेलमधील बार सील करण्यात आल्यानंतर आता एमपीजी क्लबवर बुलडोझर चालवण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनियमितता आढळल्यास बुलडोझर चालवण्याचे आदेश आठ दिवसांपूर्वी दिले होते. यानंतर आता सातारा जिल्हा प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली आहे. (Pune Porsche Car Accident)
(हेही वाचा –Sharad Pawar : कोल्हापुरी बॅनर्सची रंगली चर्चा! सुजल्यावर कळतं, शरद पवारांनी मारलंय कुठं)
सुरेंद्र अगरवालच्या मालकीच्या बारमध्ये नियमांचं उल्लंघन केल्याचं समोर आल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने बार सुद्धा सील केला होता. अग्रवाल कुटुंबीयांच्या मालकीचे महाबळेश्वरमध्ये पंचतारांकित हॉटेल आहे. हे हॉटेल सरकारी जमिनीवर बेकायदेशीर असल्याचे समोर आले होते. त्यामुळे अनियमितता असेल तर त्या हॉटेलवर बुलडोझर चालवावा असा थेट आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला होता. (Pune Porsche Car Accident)
(हेही वाचा –Elon Musk यांच्याकडून पंतप्रधान मोदींचे अभिनंदन; म्हणाले, “आता माझ्या कंपन्या भारतात…”)
सुरेंद्रकुमारच्या नावे असलेल्या महाबळेश्वरमधील बारचा परवाना रद्द करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने या हॉटेलवर धाड टाकत ही कारवाई केली होती. या प्रकरणाचा अहवाल राज्य उत्पादन शुल्क विभागाने सातारा जिल्हाधिकाऱ्यांना पाठवल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिला होता. त्यानंतर बार सील करण्यात आला होता. (Pune Porsche Car Accident)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community