Pune Porsche Car Accident : बिल्डर पुत्राला 300 शब्दांचा निबंध लिहायला सांगणारे बाल न्याय मंडळाचे ‘ते’ दोन सदस्य अखेर बडतर्फ

249
Pune Porsche Car Accident : बिल्डर पुत्राला 300 शब्दांचा निबंध लिहायला सांगणारे बाल न्याय मंडळाचे ‘ते’ दोन सदस्य अखेर बडतर्फ
Pune Porsche Car Accident : बिल्डर पुत्राला 300 शब्दांचा निबंध लिहायला सांगणारे बाल न्याय मंडळाचे ‘ते’ दोन सदस्य अखेर बडतर्फ

कल्याणीनगर अपघात प्रकरणात पोर्शे कार चालक अल्पवयीन मुलाला घटनेच्या अवघ्या 15 तासात 300 शब्दांचा निबंध लेखनासह विविध अटी घालत जामीन मंजूर करण्यात आला होता. हा जामीन ज्यांनी दिला त्या बालन्याय मंडळाच्या दोन शासकीय सदस्यांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे. या अधिकाऱ्यांवर पदाचा दुरुपयोग केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. सुटका करणाऱ्या बाल न्याय मंडळाच्या 2 सदस्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे. (Pune Porsche Car Accident)

पुण्याच्या कल्याणीनगर परिसरात 19 मे 2024 रोजी हिट अँड रनची (Pune Hit and run) घटना घडली होती. त्यात दारुच्या नशेत पोर्शे कार चालवणाऱ्या एका बिल्डरपुत्राने 2 तरुण अभियंत्यांना उडवले होते. त्यात दोघांचाही बळी गेला होता. त्यानंतर बाल न्याय मंडळाने (Juvenile Justice Board) या आरोपीला 300 शब्दांचा निबंध लिहिण्याचे निर्देश देऊन त्याला तत्काळ जामीन मंजूर केला होता. त्याचे सोशल मीडियात तीव्र पडसाद उमटले होते. त्यानतंर महिला व बाल विकास आयुक्तांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी एक समिती नियुक्त केली होती. या समितीच्या शिफारशीनुसार सरकारने बाल न्याय मंडळाच्या एल एन धनवडे व कविता थोरात या 2 सदस्यांवर बडतर्फीची कारवाई केली आहे.

(हेही वाचा – Ratan Tata : रतन टाटांबद्दलच्या या 10 गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?)

बालन्याय मंडळाच्या वादग्रस्त निर्णयानंतर महिला व बालकल्याण विभागाने या दोन्ही अधिकाऱ्यांची चौकशी केली होती. नंतर अहवाल राज्य सरकारकडे सादर केला होता. त्यानुसार या दोन्ही अधिकाऱ्यांवर पदाचा दुरुपयोग केल्याचा ठपका ठेवत त्यांना बाल हक्क न्याय मंडळावरून बडतर्फ करण्यात आले आहे. 

भीषण अपघातानंतरही थातूर-मातूर कारवाई

पुण्यातील बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल याच्या 17 वर्षाच्या मुलाने दारुच्या नशेत भरधाव वेगाने आलिशान पोर्शे गाडीने दुचाकीला धडक दिली. यामध्ये दोन आयटी अभियंत्यांचा जागीच मृत्यू झाला. अनिश अवधिया (27 वर्षे) आणि अश्विनी कोष्टा यांचा या अपघातामध्ये जागीच मृत्यू झाला. पुण्यातील कल्याणीनगरमध्ये झालेल्या अपघातात पोर्शे गाडीचा वेग इतका भरधाव होता की अश्विनी कोस्टा या 15 फूट दूर फेकल्या गेल्या. त्यानंतर पोलिसांनी त्या अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतलं. पण आरोपी अल्पवयीन असल्याने त्याला बालन्याय मंडळासमोर उभं करण्यात आलं. बालन्याय मंडळाने त्या अल्पवयीन मुलाला 300 शब्दांचा निबंध लिहिण्याची आणि इतर काही थातूरमातून शिक्षा दिल्या आणि जामीन मंजूर केला होता.

(हेही वाचा – Ratan Tata : ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा आणि सावरकर स्मारक यांचा जिव्हाळा)

या प्रकरणी त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला. मोटार वाहन कायद्यातील विवध कलमांचे उल्लंघन केल्याचाही ठपकाही त्याच्यावर ठेवण्यात आला. एवढेच नाही तर प्रस्तुत प्रकरणात अल्पवयीन आरोपीचे वडील तथा ज्या बार चालकाने अल्पवयीन आरोपी व त्याच्या मित्रांना मद्य दिले, त्याच्यावरही कलम 75 व 77 अंतर्गत कारवाई करण्यात आली. (Pune Porsche Car Accident)

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.