पुणे पोर्शे कार अपघात (Pune Porsche Car Accident) प्रकरणातील बांधकाम व्यावसायिक आरोपी विशाल अग्रवाल आणि सुरेंद्रकुमार अग्रवाल यांना न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यापूर्वीच विशाल अग्रवालची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. तत्पूर्वी पुणे पोलिसांनी (Police) विशाल अग्रवालला पोलीस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी केली होती.
(हेही वाचा – Veer Savarkar : स्वातंत्र्यवीर उपाधीची चेष्टा करणाऱ्यांना जनतेने कदापी क्षमा करू नये; सुभाष राठी यांचे आवाहन)
जामिनाचा मार्ग मोकळा
न्यायालयाने ती फेटाळत 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. आता सुरेंद्र कुमार अग्रवाल यांनाही 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे दोन्ही बाप-लेकांच्या जामिनाचा मार्ग मोकळा झाला आहे. आरोपी सुरेंद्र कुमार अग्रवाल (Surendra Kumar Agarwal) आणि विशाल अग्रवाल (Vishal Agarwal) यांस 31 मे रोजी न्यायालयात हजर करण्यात आले होते.
पुण्यातील बिल्डर विशाल अग्रवालच्या अल्पवयीन मुलाने दारू पिऊन भरधाव वेगाने बेजबाबदारपणे गाडी चालवली. त्यात अपघात होऊन दोघांचा जीव गेल्याची घटना घडली. यानंतर पुरावे लपवण्याचा जो प्रयत्न झाला, त्याने संपूर्ण देश ढवळून निघाला. त्यानंतर पुणे पोलिसांनी विशाल अग्रवाल आणि त्याचे वडील सुरेंद्र अग्रवाल यांच्यावर ड्रायव्हरला धमकावल्याच्या प्रकरणी व अपहरण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. आता न्यायालयाने दोन्ही बाप-लेकांस 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
आता विशाल अग्रवाल आणि त्याचे वडील सुरेंद्र अग्रवाल हे दोघेही जामीन मिळविण्यासाठी अर्ज करू शकतील. मात्र, ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी रक्ताचे नमुने बदलल्याच्या प्रकरणात पुणे पोलीस विशाल अग्रवालचा पुन्हा एकदा चौकशीसाठी ताबा घेऊ शकतात. (Pune Porsche Car Accident)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community