पुण्यातील सदाशिव पेठेतील सकाऊड ग्राऊंड परिसरातील हैदराबादी बिर्याणी हाॅटेलमध्ये लागलेल्या आगीत 6 वर्षीय मुलीचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ईक्रा नईम खान, असे मृत मुलीचे नाव आहे. भिकारदास मारूती मंदिराजवळ पत्र्याचे बांधकाम असलेल्या छोट्या हाॅटेलमध्ये पाऊणे अकराच्या दरम्यान आग लागल्याची घटना घडली. यादरम्यान हाॅटेलमधील पोट माळ्यावर संबंधित सहा वर्षांची मुलगी झोपलेली होती. आगीची घटना घडल्यानंतर, तिच्या आई- वडिलांनी दोन मुलांना तातडीने उचलून हाॅटेल बाहेर आणले. त्यानंतर मुलीला आणण्यासाठी ते जात असताना आगीने रौद्र रुप धारण केले. त्यामुळे त्यांना हाॅटेलमध्ये जाणे शक्य झाले नाही.
( हेही वाचा: पंतप्रधानांची तरुणांना दिवाळी भेट; 75 हजार नवनियुक्तीपत्रे कर्मचा-यांना केली सुपूर्द )
पोलिसांचा तपास सुरु
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या तीन गाड्या तत्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीत अडकलेल्या सहा वर्षांच्या मुलीला वाचवण्यासाठी अथक प्रयत्न करत आग विझवण्याचा प्रयत्न केला. त्या मुलीला अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढून तातडीने जखमी अवस्थेत देवदूत या वाहनातून सूर्या हाॅस्पिटलमध्ये नेले. मात्र, उपचारादरम्यान मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. याबाबत खडक पोलीस पुढील तपास करत आहेत.
Join Our WhatsApp Community