ATS : पुण्यात दहशतवाद्यांच्या घरातील फॅनमध्ये सापडली चिठ्ठी; बॉम्ब बनवण्याची होती माहिती 

131

पुण्यात पकडलेल्या दोन ATS दहशतवाद्यांसदर्भात मोठी माहिती समोर आली आहे. हे दोघे राहत असलेल्या घरातील फॅनमध्ये एक कागद सापडला आहे आणि या लपवलेल्या कागदात बॉम्ब बनवण्याची प्रक्रिया हाताने लिहिलेली आहे. ॲल्युमिनीअम पाईप, बल्बच्या फिलॅमेंटस आणि दोन बंदुकीच्या गोळ्या देखील या ठिकाणी सापडल्या. या दोघांनी सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांच्या जंगलांमध्ये जाऊन बॉम्बस्फोट घडवण्याची चाचणी केल्याचं देखील समोर आलं आहे.

तपासानंतर माहिती आली समोर

18 जुलै रोजी पुण्यातील कोथरुड भागात दुचाकी चोरत असताना हे सापडले होते. दोघेही मागील दीड वर्षांपासून मोस्ट वॉन्टेड होते. NIA ने यांना पकडण्यासाठी 5 लाख रुपयांचं बक्षिस घोषित केलं होतं. त्यानंतर पुण्यातील कोथरुड पोलिसांनी दुचाकी चोर म्हणून पडकलं होतं. मात्र त्यांची चौकशी केली असता ते दहशतवादी संघटनेचं काम करत असल्याचं समोर आलं होतं. त्यांनी पहिल्यांदा वेगळी नावं सांगितली होती. मात्र ट्रू कॉलरवर त्यांची नावं वेगळी आल्याने पोलिसांचा संशय आणखी वाढला आणि त्यांनी पुन्हा सखोल चौकशीला सुरुवात केली होती. त्यावेळी ते दोघे राहत असलेल्या कोंढव्यातील घरात पोलिसांनी झाडाझडती घेतली होती. त्यावेळी त्यांच्याकडे बॉम्ब तयार करण्याची पावडरही सापडली होती. आता त्यांच्याकडे थेट बॉम्ब कसा बनवायचा?, याची माहिती असलेली चिठ्ठी किंवा कागद सापडल्याने या प्रकरणात धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे.

(हेही वाचा Accident : पोलिसांच्या वाहनाला भीषण अपघात; २ पोलिसांचा जागीच मृत्यू)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.