Pune University चे वसतिगृहच बनले मुलींचा दारूचा अड्डा; तक्रार करूनही दुर्लक्ष

71

राज्यातील पुणे शहराला विद्येचे माहेरघर म्हटले जाते. परंतु विद्येच्या माहेरघरात मागील काही दिवसांपासून अमली पदार्थांच्या घटना वाढत आहेत. अशातच पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठातील (Savitribai Phule University) मुलींच्या वसतिगृहात धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. येथील मुलींच्या वसतीगृहात (pune university girls hostel) मुलींकडून मोठ्या प्रमाणात मद्यप्राशन आणि धूम्रपान केलं जात असल्याचं समोर आलं आहे. परिणामी विद्यापीठ प्रशासन यावर कोणतीही कारवाई करत नसल्याचे तक्रारदार विद्यार्थींनीचे म्हणणे आहे. (Pune University)

(हेही वाचा – १५० प्रयोग, ९ वेळा स्पेसवॉक…; Sunita Williams यांनी अंतराळात ९ महिने काय काय केले ?)

विद्यार्थिनीनेच समोर आणला गंभीर प्रकार
मिळालेल्या माहितीनुसार पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठामधील मुलींच्या वस्तीगृहात मुलींकडून मोठ्या प्रमाणात मद्यप्राशन आणि धूम्रपान करत आहेत. याबाबतचे काही फोटो आणि व्हिडिओ काढून एका वस्तीगृहातील मुलीने हा प्रकार उघडकीस आणला आहे. वसतिगृहात राहात असलेल्या एका विद्यार्थिनीनेच या सर्व गैरप्रकारची माहिती वसतिगृह महिला अधिकारी यांच्याकडे वारंवार केली होती. परंतु संबंधित अधिकाऱ्यांनी कोणती कारवाई केली नाही. त्यानंतर संबंधित विद्यार्थिनीने प्रभारी कुलसचिव आणि कुलगुरू यांना पत्र लिहून हा सर्व घटनाक्रम सांगितला आहे.

(हेही वाचा – १५० प्रयोग, ९ वेळा स्पेसवॉक…; Sunita Williams यांनी अंतराळात ९ महिने काय काय केले ?)

प्रशासनाकडून कोणतीही कारवाई नाही
याच तरुणीने मद्यप्राशन आणि धुम्रपान करणाऱ्या वस्तीगृहातील मुलींवर कोणतीही कारवाई केली जात नाहीये, असा आरोप केला आहे. विशेष म्हणजे तक्रार करूनही वसतीगृहाच्या प्रशासनाने कोणतेही पाऊल उचललेले नाहीये, असा आरोप पीडित तरुणीने केला आहे. त्यामुळे पुणे सावित्रीबाई फुले विद्यापीठात नेमकं चाललंय तरी काय? असा सवाल उपस्थित केला जातोय.

तर आम्ही आंदोलन करू…
दरम्यान, संबनधित प्रकरणावर कारवाई करावी तसेच विद्यापीठाचा परिसर नशामुक्त (Drug Free Pune University) होण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने उपाययोजना कराव्यात अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने दिला आहे.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.