पत्नीची हत्या करून पतीने केले १२ तुकडे! झारखंडमधील घटनेने देश हादरला

148

श्रद्धा हत्याकांड प्रकरणी संपूर्ण देश हादरला असतानाच आता झारखंडमधील साहिबगंजमधील धक्कादायक घटना समोर आली आहे. श्रद्धा हत्या प्रकरणाची पुनरावृत्ती झारखंडमध्ये झाली आहे. दिलदार अन्सारी नावाच्या व्यक्तीने आपल्याच पत्नीची हत्या केली, तो एवढ्यावर न थांबता त्याने त्याच्या पत्नीचे १२ तुकडे केले आहेत.

( हेही वाचा : लव्ह जिहाद, गोहत्या, धर्मांतर विरोधात सकल हिंदू एकवटले! पिंपरी-चिंचवड येथे विराट मोर्चा)

दिलदार अन्सारी याने आपल्या दुसऱ्या पत्नीची निर्घुण हत्या केली त्यानंतर तिच्या मृतदेहाचे १२ तुकडे केले. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे सध्या आरोपी दिलदार अन्सारी याची चौकशी सुरू आहे. रबिता पहाडीन असे या मृत महिलेचे नाव असून ती आदिवासी समाजातील होती.

दिलदार आणि रबिता यांचे १५ दिवसांपूर्वी लग्न जाले होते. दिलदार अन्सारीचे हे दुसरे लग्न होते. अनेक वर्षांपासून हे दोघे संपर्कात होते शुक्रवारी रात्री आरोपीने हत्या केल्याचा संशय पोलिसांना आहे. रबिता पहाडीन ही २२ वर्षीय महिला आदिवासी समाजातील होती.

पोलिसांना कसा घेतला शोध ?

शनिवारी सायंकाळी बोरीओ संथाली परिसरातील अंगणवाडी केंद्र इमारतीच्या पाठीमाहे मानवी पायाचा तुकडा सापडला यानंतर पोलिसांनी कारवाई करत तपास सुरू केला. पोलिसांनी अनेक ठिकाणी छापे टाकले. आरोपी दिलदार अन्सारीचा मामा मोईनुल अन्सारीच्या घरातून दोन धारदार शस्त्र जप्त करण्यात आली आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.