रेल्वेत (Railway) तिकीट तपासणीस पदावर नोकरी लावण्याच्या आमिषाने एका निवृत्त लष्करी जवानाची १७ लाख २७ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी एका महिलेसह साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी संजीवनी पाटणे (२७, रा. केदारी पेट्रोल पंपाजवळ, वानवडी), शुभम मोड (रा. येवलेवाडी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका निवृत्त जवानाने फिर्याद दिली आहे.
(हेही वाचा – Ladki Bahin Yojana मध्ये बांगलादेशी घुसखोर महिलांची ‘घुसखोरी’; कथावाचक देवकीनंदन ठाकूर यांचा आरोप)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संजीवनी पाटणे (Sanjeevani Patane) हिने निवृत्त जवानाला रेल्वेत तिकिट तपासणीस असल्याची बतावणी केली होती. फिर्यादी यांची भाची आणि पुतणीला रेल्वेत नोकरी लावते, असे सांगून त्यांच्याकडून पैसे घेतले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community