Rajan Khan Son : लेखक राजन खान यांच्या 28 वर्षीय मुलाची आत्महत्या

220
Rajan Khan Son : लेखक राजन खान यांच्या 28 वर्षीय मुलाची आत्महत्या
Rajan Khan Son : लेखक राजन खान यांच्या 28 वर्षीय मुलाची आत्महत्या

लेखक राजन खान यांच्या मुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना हहडली आहे. (Rajan Khan Son) ही घटना पिंपरी चिंचवड शहरातील तळेगाव दाभाडे परिसरात सोमवारी सायंकाळी उघडकीस आली आहे. डेबू राजन खान असे या युवकाचे नाव आहे. वयाच्या अवघ्या 28 व्या वर्षी त्याने असे टोकाचे पाऊल उचलल्याने खळबळ उडाली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने सुसाइड नोटदेखील लिहीली आहे. (Rajan Khan Son)

(हेही वाचा – ISIS Terrorists : दिल्लीत ISIS च्या दहशतवाद्यांना अटक; राममंदिर आणि मोठे नेते होते टारगेट)

लेखक राजन खान यांच्या आयटी अभियंता मुलाने आत्महत्या केल्यानं खळबळ उडाली. (Rajan Khan Son) पुण्यातील सोमटने फाटा येथे ही घटना सोमवारी सायंकाळी समोर आली. डेबू राजन खानने गळफास घेत आयुष्य संपवलं. आर्थिक विवंचनेतून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले, तसा उल्लेख आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत केला आहे. लेखक राजन खान यांचा मुलगा डेबू आयटी अभियंता होता. तो सोमटणे फाटा इथं एकटाच राहायचा. (Rajan Khan Son)

डेबू ने काल सायंकाळी राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली आहे. तत्पूर्वी डेबूने सुसाईड नोट लिहून ठेवली होती. डेबूने आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहिली असून त्यात मैत्रीण, आईचा उल्लेख आहे. त्याचबरोबर काही आर्थिक देवाण- घेवाण केल्याचाही उल्लेख असून अनेकांकडे त्याचे पैसे अडकलेले होते. असं तळेगाव पोलिसांनी सांगितल आहे. आर्थिक चणचणीतून डेबूने आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. (Rajan Khan Son)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.