राजस्थानच्या सांगानेर पोलिसांनी सय्यद शाह खावर अली या २७ वर्षीय तरुणाला अटक केली आहे. मॅट्रिमोनिअल साइट्सच्या माध्यमातून तो मुलींना अडकवायचा. त्यांचे लैंगिक शोषण करायचा, त्यानंतर तो त्यांना लुटून पळून जायचा. वेगवेगळ्या राज्यातील 50 हून अधिक मुली त्याचा बळी ठरल्याचे सांगण्यात येत आहे. कधी तो सर्वोच्च न्यायालयातील वकील म्हणून तर कधी सिंगापूरचा व्यापारी म्हणून मुलींशी संपर्क साधायचा. मुळात तो हरियाणातील अंबाला येथील रहिवासी आहे.
शनिवारी, 6 मे 2023 रोजी जयपूरच्या सांगानेर पोलीस स्टेशन हद्दीतील शांती विहार येथील एका तरुणीने त्याच्याविरोधात तक्रार दिली होती. तक्रारीत पीडितेने सांगितले की, तिने लग्नासाठी मॅट्रिमोनियल साइटवर तिचा डेटा टाकला होता. सय्यद शाह अली या साईटवरून तिच्या संपर्कात आला. त्याने स्वत:चे सिंगापूर येथील व्यापारी असल्याचे सांगितले. सुप्रीम कोर्टात वकिलीही करतो, असेही सांगितले. काही दिवसांच्या संभाषणानंतर तो 27 एप्रिल 2023 रोजी पीडितेला भेटण्यासाठी जयपूरला आला. सय्यद अली 6 मे पर्यंत जयपूरमध्ये बहाणा करून राहिला होता. शनिवारी तो तरुणीला तिच्या फ्लॅटवर भेटण्यासाठी गेला होता. सोन्याची बांगडी बनवण्याच्या बहाण्याने दागिने ठेवण्याची जागा त्याने पाहिली. त्यानंतर त्याच दिवशी तरुणीला फ्लॅटच्या बाहेर पाठवून तिच्या दागिन्यांवर हात साफ केला. दागिन्यांव्यतिरिक्त त्याने मुलीच्या कपाटातून काही रोख रक्कम आणि महागडे घड्याळही चोरले. त्यानंतर तातडीचे काम असल्याचे सांगून ते तेथून निघून गेले.
फसवणूक झाल्याच्या भीतीने तरुणीने प्रथम सय्यद अलीला फोन केला. त्याने प्रथम चोरीचा इन्कार केला आणि नंतर काही वेळाने आपला फोन बंद केला. यानंतर तरुणीने पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी लोकेशन ट्रेस करून सय्यद शाह अलीला अटक केली. पोलिसांच्या चौकशीत त्याने 50 हून अधिक मुलींना आपली शिकार बनवल्याची कबुली दिली आहे. तो मुलींना गोड बोलून आमिष दाखवायचा आणि नंतर लैंगिक अत्याचार करायचा. मुलीचा विश्वास संपादन केल्यानंतर तो तिच्या मौल्यवान वस्तू चोरून फरार व्हायचा.
Join Our WhatsApp Community