Rakesh Wadhawan : ‘एचडीआयएल’ ६ कोटींचे साहित्य १८ लाखात विकले; वाधवन यांची पोलिसांत तक्रार

123
Rakesh Wadhawan : 'एचडीआयएल' ६ कोटींचे साहित्य १८ लाखात विकले; वाधवन यांची पोलिसांत तक्रार
Rakesh Wadhawan : 'एचडीआयएल' ६ कोटींचे साहित्य १८ लाखात विकले; वाधवन यांची पोलिसांत तक्रार
नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल (NCLT) ने रिअल इस्टेट फर्म एचडीआयएलच्या प्रकल्पांवर देखरेख करण्यासाठी नियुक्त केलेल्या एका रिझोल्यूशन प्रोफेशनलने कुर्ला येथील कंपनीच्या आवारात साठवलेले सुमारे ६ कोटी किमतीचे साहित्य १८ लाखांना विकले . एचडीआयएलचे प्रवर्तक राकेश वाधवान (Rakesh Wadhawan) यांनी या प्रकरणाबाबत व्हीबी नगर पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
विनोबा भावे नगर पोलिसांना दिलेल्या निवेदनात, वाधवन यांनी दावा केला की एचडीआयएल (HDIL) ने कुर्ल्यामध्ये प्रीमियर रेसिडेन्सी नावाचा एक मोठा झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प हाती घेतला आहे, या प्रकल्पात१८ हजार ६४५सदनिका असलेल्या ३० इमारतींचा समावेश आहे. प्रकल्पाचे काम २००७ मध्ये सुरू झाले आणि २०११ पर्यंत ते सुमारे ७० टक्के पूर्ण झाले, परंतु परवानगी अभावी उर्वरित काम हाती घेता आले नाही. अखेरीस, प्रकल्पासाठी सेंट्रल बँक ऑफ इंडियाकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यात कंपनी अपयशी ठरल्याने, हे प्रकरण एनसीएलटीकडे (NCLT)गेले, त्यांनी या प्रकल्पावर लक्ष ठेवण्यासाठी रिझोल्यूशन प्रोफेशनलची नियुक्ती केली. (Rakesh Wadhawan)
वाधवन यांनी तक्रार अर्जात म्हटले की, एप्रिल २०२४ मध्ये त्यांची जामिनावर सुटका झाल्यानंतर, त्यांनी कुर्ला पश्चिम येथील कंपनीच्या आवारात भेट दिली आणि तीन इमारतींच्या तळमजल्यावर ठेवलेला सर्व साहित्य आणि फिटिंग्ज गायब असल्याचे आढळून आले,  त्यांनी याबाबत रिझोल्युशन प्रोफेशनलकडे चौकशी केली असता, त्यांनी ८ ऑगस्ट रोजी एक ईमेल पाठवला, त्या ईमेल मध्ये सर्व साहित्याची यादी केली होती आणि ती विकून१८ लाख २हजार १३० रुपये मिळाले असल्याचे नमूद करण्यात आले. ६ कोटी किमतीचे साहित्य १८ लाखांना कसे आणि का विकले ,असे वाधवन त्यांना विचारले असता त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद देण्यात आला नाही, असे वाधवन यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.  (Rakesh Wadhawan)
वाधवन यांनी याबाबत विनोबा भावे नगर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला असता मंगळवारी पोलिसांनी वाधवन यांचा जबाब नोंदवून घेतला असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.  (Rakesh Wadhawan)
हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.