Rameshwaram Cafe Blast : रामेश्वर कॅफे स्फोटाच्या २ आरोपींचे फोटो जारी; माहिती देणाऱ्यांना १० लाखांचे बक्षीस

बंगळुरूच्या रामेश्वर कॅफेत झालेल्या स्फोटात अनेक ग्राहक आणि हॉटेल कर्मचारी जखमी झाले होते. तसेच मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. या स्फोटात काही जण गंभीर जखमी झाले आहेत.

265
Rameshwaram Cafe Blast : रामेश्वर कॅफे स्फोटाच्या २ आरोपींचे फोटो जारी; माहिती देणाऱ्यांना १० लाखांचे बक्षीस

कर्नाटच्या बेंगळुरू येथील रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट (Rameshwaram Cafe Blast) प्रकरणात २ प्रमुख आरोपींचा शोध सुरू आहे. नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने (एनआयए) त्यांच्या अटकेची माहिती देणाऱ्यांना प्रत्येकी १० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : नाशिकच्या बदल्यात राष्ट्रवादीला राज्यसभेचा पर्याय ?)

दोन्ही आरोपी सध्या फरार :

एनआयएने (Rameshwaram Cafe Blast) याप्रकरणाचा मुख्य सूत्रधार असलेल्या मुझम्मील शरीफ याला २७ मार्च रोजी अटक केली आहे. तसेच एनआयएने जनतेला याप्रकरणाततील वॉन्टेड आरोपी मुसाविर हुसैन शाजिब आणि अब्दुल मतीन अहमद ताहा यांच्यासंदर्भात माहिती देण्याची विनंती केली आहे. एनआयएने ३ मार्च रोजी या प्रकरणाचा तपास आपल्या हाती घेतला. यापूर्वी मुसावीर शाजिब हुसेन हा स्फोट (Rameshwaram Cafe Blast) घडवून आणणारा मुख्य आरोपी म्हणून ओळखला होता. निवेदनात म्हटले आहे की आणखी एक कट रचणारा अब्दुल मतीन ताहा याची ओळख पटली असून दोन्ही आरोपी सध्या फरार आहेत. (Rameshwaram Cafe Blast)

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : शरद पवार गटाची पहिली यादी आज जाहीर होणार; कोणाला मिळणार संधी ?)

एनआयएनकडून बरेलीतील व्यक्तीची बराच वेळ चौकशी :

बंगळुरूच्या रामेश्वर कॅफेत (Rameshwaram Cafe Blast) झालेल्या स्फोटात अनेक ग्राहक आणि हॉटेल कर्मचारी जखमी झाले होते. तसेच मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. या स्फोटात काही जण गंभीर जखमी झाले आहेत. तपासासंदर्भात एनआयएने गुरुवारी (२८ मार्च) बरेलीतील एका व्यक्तीची बराच वेळ चौकशी केली होती. बरेलीचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक सुशील चंद्रभान यांनी सांगितले की, एनआयएचे पथक लखनऊहून बरेलीला आले होते आणि धौरतांडा येथील एका व्यक्तीची चौकशी करण्यासाठी त्यांनी पोलिसांची मदत घेतली होती. पथकाने त्याची भोजीपुरा पोलीस ठाण्यात स्वतंत्र ठिकाणी चौकशी केली आणि नंतर ते परतले. ही चौकशी कोणत्या संदर्भात करण्यात आली याची माहिती स्थानिक पोलिसांना देण्यात आली नाही. (Rameshwaram Cafe Blast)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.