Rameshwaram Cafe Bomb Blast : आरोपीवर 10 लाख रुपयांचे बक्षीस; एनआयएने प्रसिद्ध केला फोटो

Rameshwaram Cafe Bomb Blast : या प्रकरणाचा तपास चालू असतांना सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्फोटाच्या तासाभरापूर्वी एक तरुण कॅफेमध्ये आल्याचे दिसत आहे. तो तरुण तेथे काही मिनिटे थांबल्याचे दिसत आहे.

218
Rameshwaram Cafe Bomb Blast : आरोपीवर 10 लाख रुपयांचे बक्षीस; एनआयएने प्रसिद्ध केला फोटो
Rameshwaram Cafe Bomb Blast : आरोपीवर 10 लाख रुपयांचे बक्षीस; एनआयएने प्रसिद्ध केला फोटो

बेंगळुरूमधील (Bangalore) रामेश्वरम कॅफेमध्ये आयईडी बॉम्ब पेरणाऱ्या व्यक्तीवर एनआयएने 10 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. एनआयएने पोस्टर जारी करून या प्रकरणातील आरोपीचे छायाचित्र प्रसारित केले आहे. (Rameshwaram Cafe Bomb Blast)

या प्रकरणाचा तपास चालू असतांना सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्फोटाच्या तासाभरापूर्वी एक तरुण कॅफेमध्ये आल्याचे दिसत आहे. तो तरुण तेथे काही मिनिटे थांबल्याचे दिसत आहे. त्याने कॅफेमध्ये इडलीची प्लेट मागवली होती. परंतु ऑर्डर येण्यापूर्वीच बॅग कॅफेमध्ये ठेवून तो निघून गेला. या बॅगेत टायमर लावला होता. त्या बॅगेत आयईडी होते, असे सांगण्यात येत आहे.

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : AI ची कमाल; आता एकाच वेळी ८ भाषांत ऐका नरेंद्र मोदींचे भाषण)

अद्याप कोणालाही अटक नाही

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास यंत्रणेने त्याचे स्केच तयार करून त्याचे फोटो प्रसिद्ध केले आहे. आरोपीचे वय ३० ते ४० वर्षांच्या दरम्यान असल्याचे सांगण्यात येत आहे.

या प्रकरणी तपास चालू असला, तरी घटनेत अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. या प्रकरणी केंद्रीय गुन्हे शाखा (CBI) आणि एनआयए (NIA) तपास करत आहेत. गृह मंत्रालयाच्या आदेशानंतर एनआयएने या प्रकरणाची जबाबदारी स्वीकारली आहे. शहर पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत. ते लवकरच या प्रकरणाचा खुलासा करणार आहे. या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू आहे. स्फोटानंतर रामेश्वरम कॅफे बंद असून आता ते ८ मार्चला उघडणार आहे, असे कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्वर म्हणाले.

10 लाख रुपयांचे बक्षीस

रामेश्वरम कॅफेमध्ये 1 मार्च रोजी कमी तीव्रतेचा आयईडी स्फोट घडवण्यात आला होता. ज्यात कॅफेमध्ये बसलेले 10 लोक गंभीर जखमी झाले होते. एनआयएने आरोपीचे स्केच तयार केले आहे. वाँटेडच्या पोस्टसोबतच त्याच्याबद्दल माहिती देणाऱ्यास 10 लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येईल, असे एनआयएने जाहीर केले आहे. याशिवाय माहिती देणाऱ्या व्यक्तीची ओळखही उघड केली जाणार नाही, असेही पोस्टरमध्ये दिले आहे. (Rameshwaram Cafe Bomb Blast)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.