बालगृहातील अल्पवयीन मुलीवर बलात्कार! पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, लातूरमधील धक्कादायक घटना

132

लातूरमध्ये बालगृहात घडलेला धक्कादायक प्रकार समोर उघडकीस आल असून या घटनेमुळे संपूर्ण लातूर हादरले आहे. लातूरमधील महिला आणि बालविकास विभागाच्या बालगृहातील अल्पवयीन मुलीला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली आहे.

( हेही वाचा : पंतप्रधान मोदी यांच्या ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमाचे सूक्ष्म नियेाजन करावे – दीपक केसरकर )

गुंगीचे औषध देऊन अत्याचार 

या घटनेनंतर लातूर एमआयडीसी पोलीस ठाण्यात मुलीच्या मैत्रिणीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय दंड विधान आणि पोक्सो कायद्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील एका महिलेला अटक सुद्ध करण्यात आली आहे. बालगृहातील ही मुलगी महाविद्यालयाच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत होते. मैत्रिणींसोबत पार्टीला जाण्याचे ठरल्यावर संबंधित मैत्रिणीने तिच्या पतीला बोलावून घेतले. त्यानंतर मैत्रिणीचा पती तिथे रिक्षा घेऊन आला. रिक्षाचालकासह ५ जण अंबाजोगाई मार्गावरील शेतात गेले. रिक्षाचालकाने एका बाटलीतील गुंगीचे औषध बालगृहातील मुलीला पाजले. त्यानंतर तिच्यावर अत्याचार करण्यास सुरूवात केली. विरोध केल्यानंतर तिला मारून टाकण्याची धमकी देण्यात आली. यातच मुलीला गुंगी आली, जेव्हा तिला शुद्ध आली तेव्हा ती बालगृहात होती.

५ जणांविरोधात गुन्हा दाखल

बालगृहात पीडित मुलीकडे विचारण करण्यात आल्यानंतर घडलेला प्रकार उघडकीस आला. त्यामुळे प्रशासनातील अधिकाऱ्यांनी पीडित मुलीला घेऊन पोलीस ठाण्यात तक्रार केली. यानंतर ५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पीडितेच्या ३ पैकी एका मैत्रिणीला अटक करण्यात आली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.