जोगेश्वरी भूखंड घोटाळा (Jogeshwari plot scam) प्रकरणी ईडीने दाखल केलेल्या मनी लॉन्ड्रिंगच्या गुन्ह्यात शिवसेना ठाकरे गटाचे नेते रवींद्र वायकर (Ravindra Vaikar) यांची ईडीकडून तब्बल ९ तास चौकशी करण्यात आली आहे. वायकर हे दुपारी १२ वाजता चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात दाखल झाले होते. बुधवारी ईडीकडून खिचडी घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांचे बंधू संदीप राऊत (Sandeep Raut) आणि बॉडीबॅग खरेदी घोटाळा प्रकरणी मुंबईच्या माजी महापौर यांना चौकशीसाठी बोलाविण्यात आले आहे.
(हेही वाचा – Shri Siddhivinayak mandir : परिसराच्या विकासासाठी विशेष प्रकल्प हाती, रस्ता रुंदीकरणासह मंदिराचा कायापालट)
जोगेश्वरी येथील भूखंड घोटाळा प्रकरणी ईडीने दाखल केलेल्या मनी लॉन्ड्रिंग गुन्ह्याच्या प्रकरणी ९ जानेवारी रोजी वायकर यांच्या घरासह ७ ठिकाणी छापेमारी करण्यात आली होती. या छापेमारीनंतर ईडीने वायकर यांना गेल्या आठवड्यात चौकशीसाठी समन्स बजावले होते. आजारपणाचे कारण पुढे करून वायकर हे चौकशीसाठी गैरहजर राहिले. त्यानंतर ईडीने पुन्हा वायकर यांना समन्स पाठवून मंगळवार, २३ जानेवारी रोजी चौकशीसाठी ईडी कार्यालयात बोलावले होते.
ईडीच्या चौकशीला सहकार्य केले आहे
वायकर हे मंगळवारी दुपारी १२ वाजता ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले होते. ईडीने वायकर यांची जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी तब्बल ९ तास चौकशी केल्यानंतर रात्री ९ वाजता रवींद्र वायकर हे ईडी कार्यालयातून बाहेर पडले. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी सवांद साधला. ईडीकडून बांधकामासंदर्भात १९ वर्षांचे कागदपत्रे मागविण्यात आली आहे. एवढी वर्षांची कागदपत्रे तातडीने देऊ शकत नाही. मी वेळ मागितला आहे. माझ्याकडे जी कागदपत्रे होती, ती ईडीला तपासासाठी दिली आहेत. मी ईडीच्या चौकशीला सहकार्य केले असून पुढेही करणार आहे, असे वायकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना सांगितले.
(हेही वाचा – CJI Scolds Advocate : हा रेल्वे प्लॅटफॉर्म नाही; सरन्यायाधिशांनी वकिलाला का फटकारले ?)
काय आहे जोगेश्वरी भूखंड घोटाळा…
जोगेश्वरीतील मुंबई महानगर पालिकेचे खेळाचे मैदान आणि उद्यानांसाठी आरक्षित असलेल्या भूखंडावर पंचतारांकित हॉटेल बांधण्याची परवानगी मिळवून मनपाची ५०० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप रवींद्र वायकर यांच्यावर आहे, त्यांनी भूखंडासाठी परवानगी मिळवण्यासाठी आपल्या राजकीय संबंधांचा वापर केल्याचा आरोप वायकर यांच्यावर आहेत. मुंबई आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणी रवींद्र वायकर आणि त्यांच्या पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेकडून रवींद्र वायकर यांची चौकशी देखील करण्यात आली होती. या प्रकरणात ईडीने देखील तपास सुरू करून ९ जानेवारी रोजी सकाळी रवींद्र वायकर यांच्या निवासस्थानासह मुंबईतील ७ ठिकाणी छापेमारी सुरू केली आहे. या छापेमारीत वायकर यांचे व्यावसायिक भागीदार आसू नेहलनाई, राज लालचंदानी आणि पृथपाल बिंद्रा, तसेच वास्तुविशारद अरुण दुबे यांच्या परिसराची झडती घेतली जात आहे.
बुधवारी पेडणेकर आणि राऊत ईडीसमोर….
खिचडी घोटाळ्या उबाठा नेते प्रकरणी संजय राऊत यांचे लहान भाऊ संदीप राऊत यांना ईडीची नोटीस बजावण्यात आली असून ३० जानेवारी रोजी त्यांना ईडीच्या कार्यालयात चौकशीकामी हजर होण्यास सांगण्यात आले आहे. दरम्यान बॉडी बॅग्ज खरेदी घोटाळा प्रकरणी मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची देखील बुधवारी ईडीकडून चौकशी करण्यात येणार आहे. बुधवारी संदीप राऊत आणि पेडणेकर या दोघांची चौकशी करण्यात येणार आहे. (Ravindra Vaikar)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community