Ravindra Waikar : जोगेश्वरी भूखंड घोटाळा, वायकरांनी फेटाळला ५०० कोटींचा दावा

वायकर यांनी सांगितले की ते जमिनीचे कायदेशीर मालक आहेत आणि महापालिकेच्या परवानगीने त्यांनी त्या जमिनीवर हॉटेलचे बांधकाम सुरू केले. मात्र, राजकीय दबावामुळे मनपाने दोन वर्षांनंतर बांधकाम थांबवून ५०० कोटींचा जमीन घोटाळा केल्याचा आरोप केला.

241
Ravindra Waikar : जोगेश्वरी भूखंड घोटाळा, वायकरांनी फेटाळला ५०० कोटींचा दावा

जोगेश्वरी येथील भूखंड घोटाळा प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सोमवारी (२९ जानेवारी) ठाकरे (Ravindra Waikar) आमदार रवींद्र वायकर यांची ९ तास चौकशी केली.

(हेही वाचा – Amrita Shergill : एम. एफ. हुसैन देखील पाणी भरेल जिच्या घरी अशी हंगेरियन-भारतीय सुप्रसिद्ध चित्रकार अमृता शेरगिल)

वायकर (Ravindra Waikar) यांनी नऊ तासांच्या चौकशीनंतर दावा केला की, ५०० कोटींची फसवणूक कथित आरोपांवर आधारित आहे. वायकर यांच्या म्हणण्यानुसार, अंमलबजावणी संचालनालय (ईडी) च्या अधिकाऱ्यांनी संबंधित जमिनीवर आयोजित कार्यक्रम, समारंभ आणि विवाह यातून कमावलेल्या नफ्याशी संबंधित १९ वर्षांच्या बँक स्टेटमेंटची मागणी केली. वायकर यांनी दावा केला की “मी आणि चार भागीदार आहेत, त्यांनी या जमिनीवर झालेल्या सभारंभातुन १९ वर्षांमध्ये एकूण ३६ कोटी कमावले. त्यांनी जमिनीच्या देखभालीसाठी २० कोटी खर्च केले आणि त्यानंतर, प्रत्येक भागीदाराने १९ वर्षांच्या कालावधीत केवळ १कोटी २२लाख कमावले.” वायकर (Ravindra Waikar) यांच्या मते ५०० कोटी रुपयांच्या घोटाळ्याचे आरोप बोगस आणि बिनबुडाचे आहेत.

(हेही वाचा – Budget Session 2024 : अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशींनी बोलवली सर्वपक्षीय बैठक)

राजकीय दबावामुळे मनपाने प्रकल्पाचे काम थांबवल्याचा वायकर यांचा दावा….

वायकर (Ravindra Waikar) यांनी सांगितले की ते जमिनीचे कायदेशीर मालक आहेत आणि महापालिकेच्या परवानगीने त्यांनी त्या जमिनीवर हॉटेलचे बांधकाम सुरू केले. मात्र, राजकीय दबावामुळे मनपाने दोन वर्षांनंतर बांधकाम थांबवून ५०० कोटींचा जमीन घोटाळा केल्याचा आरोप केला. आज, ईडीच्या अधिकाऱ्यांनी मला जमिनीचा व्यवहार, खरेदी प्रक्रिया, मनपाकडून मिळालेल्या परवानग्या, १९ वर्षांतील कमाई आणि जमीनीवर बांधकामसाठी केलेली गुंतवणूक याबद्दल चौकशी केली. मी ईडीच्या तपासात पूर्ण सहकार्य केले आणि पुन्हा बोलवल्यास पुन्हा चौकशीला सामोरे जाईल. (Ravindra Waikar)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.