आरबीआयला (RBI) आलेल्या धमकीचा मेल प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेने (Mumbai Crime Branch) गुजरात राज्यातील वडोदरा (Vadodara) येथून तीन जणांना अटक केली आहे. खोडसाळपणा म्हणून या तिघांनी आरबीआयला धमकीचा मेल (RBI Threat Mail) केला होता अशी महिती समोर येत आहे. याप्रकरणी तिघांकडे चौकशी करण्यात येत आहे अशी महिती पोलिसांनी दिली आहे. मोहम्मद अर्शिल मो. इक्बाल टोपाला (२७) आदिल भाई रफिक भाई मलिक (२३) आणि वसीमराजा अब्दुल रज्जाक मेमन (३५) असे अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. मोहम्मद आर्शिल हा बीबीए पदवीधर असून शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंगचे काम करतो. तर इतर दोघांपैकी आदिल भाई रफिक हा अंड्याच्या दुकानात नोकरीला असून वसीमराजा अब्दुल हा पानटपरी चालवतो. मुंबई गुन्हे शाखेच्या (Mumbai Crime Branch) कक्ष १२ च्या पथकाने या तिघांना गुजरात मधील वडोदरा (Vadodara) येथून अटक करून माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे. (RBI Threat Mail)
बड्या अधिकाऱ्यांचा सहभाग
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (Reserve Bank of India) मुंबईच्या कार्यालयाच्या अधिकृत ईमेल आयडीवर मंगळवारी सकाळी [email protected] या ईमेल आयडी वरून धमकीचा मेल प्राप्त झाला होता. इंग्रजी भाषेत आलेल्या या ईमेल मध्ये आरबीआयने (RBI) खाजगी क्षेत्रातील बँकासह भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा केला असल्याचे म्हटले होते, तसेच या घोटाळ्यात आरबीआय (RBI) गव्हर्नर आणि वित्त मंत्री प्रमुख बँकिंग अधिकारी आणि भारतातील मंत्र्यांचा उल्लेख करून या घोटाळ्यात त्यांचा सहभाग असल्याचे म्हटले आहे. आरबीआय (RBI) फोर्ट मुंबई, एचडीएफसी हाऊस चर्चगेट आणि बीकेसी येथील आयसीआयसीआय बँक (ICICI Bank) टॉवर्ससह ११ वेगवेगळ्या ठिकाणी बॉम्ब पेरण्यात आले आहे. आरबीआय गव्हर्नर (RBI Governor) आणि वित्तमंत्री यांनी त्यांच्या पदाचा तात्काळ राजीनामा द्यावा आणि त्यांनी प्रेस स्टेटमेंट जारी करावी अशी मागणी ईमेल मध्ये करण्यात आली आहे. आमची मागणी दुपारी दीड पर्यंत मान्य न झाल्यास एकाच वेळी तिन्ही बँकासह ११ ठिकाणी बॉम्बस्फोट केले जातील अशी धमकी ईमेल कर्त्याने दिली होती. (RBI Threat Mail)
(हेही वाचा – IT Parkच्या नावाखाली इमारतीचे बांधकाम; प्रत्येक वर्षी सादर करावी लागणार जागेच्या वापरासंदर्भातील कागदपत्रे)
खोडसाळपणा करण्यासाठी धमकीचा मेल
या प्रकरणी एमआरए मार्ग पोलिस ठाण्यात (MRA MARG POLICE STATION) गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुंबई गुन्हे शाखा (Mumbai Crime Branch) कक्ष १२च्या पथकाने धमकीचा ईमेल करणाऱ्याचा तांत्रिक पध्दतीने शोध घेऊन बुधवारी पहाटे तिघांना वडोदरा येथून ताब्यात घेऊन मुंबईत आणण्यात आले. ताब्यात घेण्यात आलेले तिघे कुठल्याही दहशतवादी संघटनेशी संबंधित नसून त्यांनी केवळ खोडसाळपणा म्हणून खिलाफतइंडिया नावाने मेल आयडी बनवून हा मेल केल्याची माहिती प्राथमिक तपासात समोर येत आहे. या तिघांचा ताबा एमआरए मार्ग पोलिसांकडे (MRA Marg Police) देण्यात आला असून तिघांना अटक करण्यात आली आहे. गुरुवारी या तिघांना न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष धनवटे यांनी दिली. (RBI Threat Mail)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community