Mumbai International Airport : मुंबई विमानतळाची ड्रोनद्वारे रेकी, गुन्हा दाखल

81
Mumbai International Airport : मुंबई विमानतळाची ड्रोनद्वारे रेकी, गुन्हा दाखल
  • प्रतिनिधी 

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाची (Mumbai International Airport) ड्रोनद्वारे रेकी करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विमानतळावरील सुरक्षा रक्षकांनी हा प्रकार हाणून पाडला असून ड्रोन जप्त करून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सहार पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून अत्यंत संवेदनशील क्षेत्रात ड्रोन चालवणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू आहे, असे पोलिसांनी सांगितले.

(हेही वाचा – Ind vs Eng, 2nd ODI : रोहितचा मैदानातच चढला पारा, हर्षितला म्हणाला …)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (Mumbai International Airport) येथील एका वैमानिकाला प्रथम एअरसाईड एरियाजवळ, एप्रॉन एरियामध्ये (जिथे विमाने पार्क केली जातात) ड्रोन उडताना दिसले. वैमानिकाने तात्काळ ही बाब विमानतळावरील सुरक्षा व्यवस्था सांभाळणारे सीआयएसएफ (केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल) अधिकाऱ्यांना माहिती दिली. सीआयएसएफने तात्काळ एप्रॉन एरियाजवळ धावून घेऊन मुंबई पोलिसांना सूचना दिली. विमानतळ अधिकाऱ्यांना ड्रोन जमिनीवर पडलेला आढळला.

(हेही वाचा – Delhi निकालानंतर Shiv Sena UBT चे धाबे दणाणले; आघाडीसाठी लांगूलचालन!)

पोलीस सूत्राच्या म्हणण्यानुसार, हा ड्रोन अतिसंवेदनशील भागात कसा आला?, कदाचित रेकी करण्याच्या उद्देशातून हा ड्रोन उडविण्यात आला का? याचा तपास सुरु आहे. पोलिस अंमलदार किशोर बाबड यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या कलम २२३ (सार्वजनिक सेवकाने जारी केलेल्या आदेशाचे उल्लंघन) अंतर्गत ड्रोन उडवल्याबद्दल अज्ञात लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. (Mumbai International Airport)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.