कोरोना काळात खरेदी करण्यात आलेल्या रेमडेसिव्हिर (Remdesivir) खरेदी घोटाळा प्रकरणी मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेने आग्रीपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मायलन लॅबोरेटरीज लिमिटेड आणि मनपाच्या अज्ञात अधिकारी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.(Remdesivir Scam)
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रेमडेसिव्हिर (Remdesivir) खरेदी घोटाळा हा जवळपास ५.९६ कोटीच्या घरात आहे. मुंबई महानगर पालिका (BMC) ने मायलन लॅबोरेटरीज लिमिटेडकडून (mylan laboratories ltd) मार्च २०२१ ते एप्रिल २०२१ या कालावधीत कोविड-१९ महामारी दरम्यान रेमडेसिव्हिर इंजेक्शन्स खरेदी करण्यात आली होती. मायलनने सुरुवातीला ६५० रुपये प्रति कुपी या दराने रेमडेसिव्हिरच्या ४०,००० कुपी मनपाला वितरित केल्या.
(हेही वाचा-PMPML : पुण्यात पुन्हा एकदा संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती; वाहनचालकाशी वाद झाल्याचे क्षुल्लक कारण)
काही दिवसांनंतर, मनपाने मायलनकडून १,५६८ रुपये प्रति कुपी या दराने तब्बल दोन लाख रेमडेसिव्हिर कुपी खरेदी केल्या.रेमडेसिव्हीर(Remdesivir) एकाच कंपनीकडून दोनदा खरेदी करण्यात आल्याने आणि किंमतींमध्ये प्रचंड तफावत असल्याने, मुंबई आर्थिक गुन्हे शाखेकडून या खरेदी घोटाळ्याची चौकशी सुरू होती.आर्थिक गुन्हे शाखेच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) दर्जाच्या अधिकाऱ्याने या संदर्भात आग्रीपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर ही बाब समोर आली आहे.
आग्रीपाडा पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम ४०६, ४०९, ४२०, १२० (बी) आणि ३४ अंतर्गत मायलन लॅबोरेटरीज (mylon ) लिमिटेड, मनपाच्या अज्ञात अधिकारी आणि गुन्हा नोंदवला आहे. जानेवारी २०२३ मध्ये, राज्य लोकायुक्तांनी कोविड-१९ महामारी दरम्यान रेमडेसिव्हिर इंजेक्शनच्या (Remdesivir injection) खरेदीत भ्रष्टाचाराच्या आरोपांबाबत मनपाला क्लीन चिट देण्यात आली होती.
Join Our WhatsApp Community